पारनेर: तालुक्यातील मांडवे खुर्द गावचे सुपुत्र, टाकळी ढोकेश्वर येथील ढोकेश्वर विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी कुमार "अतिश बाळकृष्ण गागरे" यांची ग्लोबल अचिव्हर्स प्राईड ऑफ नेशन प्रतिभा सन्मान पुरस्कार"वर्ष 2020 साठी निवड झाली.
कुमार अतिश यांचे बालपणीचे 1ली ते 4थी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झालेले आहे.तर पुढील माध्यमिक शिक्षण विखे पाटील सैनिकी प्रशाला, लोणी-प्रवरानगर, तसेच श्री ढोकेश्वर माध्यमिक विद्यालय, आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये (विज्ञान)शाखेत झालेले आहे. पुढील पदवीचे उच्च शिक्षण शिरूर येथील सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फ़ार्मसी मधून औषधविज्ञान शाखेत(बी. फ़ार्मसी)पूर्ण केलेले आहे. कुमार अतिश यांनि सुरुवातीपासूनच शालेय अभ्यासात विशेष प्राविण्य मिळवले होते. तसेच विविध स्पर्धा परीक्षा, वार्षिक स्नेहसंमेलन, सांस्कृतिक कलागुण प्रदर्शन उपक्रमात त्यांचा उल्लेखनिय सहभाग होता. त्याचबरोबर साहसी गिर्यारोहण, व्हालीबॉल, हॅन्डबॉल सारख्या मैदानी खेळा मध्ये देखील त्यांनी विशेष प्राविन्य मिळवले होते.
पारनेर तालुक्यातील उत्तर भागातील मुळा नदीतीरावरिल मांडवे खुर्द गावचे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक श्री.बाळकृष्ण रघुनाथ गागरे आणी ग्रामविकास अधिकारी श्रीमती पुष्पा बाळकृष्ण गागरे यांचे सुपुत्र आणी पुणे येथील प्रतिथयश Alkem pharmaceutical pvt. ltd या नामांकित MNC फार्मा कंपनी मध्ये Medical executive पदावर कार्यरत असणारे कुमार अतिश बाळकृष्ण गागरे यांना आपल्या प्रोफेशनल मेडिसिन आणी हेल्थकेअर क्षेत्रात 2019 -20 या वर्षामध्ये केलेल्या अतुलनिय कामगिरीसाठी मुंबई येथील मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीमार्फत दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील "ग्लोबल अचिव्हर्स प्राईड ऑफ नेशन प्रतिभा सन्मान पुरस्कार (वर्ष 2019-20)साठी सन्मानीत करण्यात आलेले आहे. सदर पुरस्कार वितरण सन्मान समारंभाचा "भव्य आंतरराष्ट्रीय सन्मान'सोहळा(वर्ष 2020) "थायलंड" ची राजधानी "बँकॉक" या ठिकाणी 14 डिसेंबर 2020 रोजी आयोजित केला जाणार आहे तर राष्ट्रीय समारंभ 24th डिसेंबर रोजी भारताची राजधानीचे शहर "नवी दिल्ली" या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. या निवडीमुळे कुमार अतिश बाळकृष्ण गागरे यांच्यावर मांडवे परिसरातुन कौतुकाचा वर्षाव होत आहे. या निवडीमुळे निश्चित मांडवे गावच्या नावलौकिकामध्ये विशेष भर पडणार आहे. या उज्ज्वल यशाचे सर्वस्वी श्रेय कुमार अतिश गागरे आपल्या प्रयत्नासोबतच आपल्या आई-वडिलांना देतात.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद