पारनेर / दि.०२ (प्रतिनिधी चंद्रकांत कदम)गावाअंतर्गत नळयोजनेच्या पीव्हीसी पाइपसाठी शेतातून खोदलेली लाइन अद्याप पाईप टाकून बुजली नसल्याने व सध्या पाऊस पडायला सुरुवात झाली असल्याने शेतातून खोदलेल्या पाइप लाईन मुळे शेतीची कामे करायची कशी ? व लाईन बूजली नाही तर शेतकऱ्यांचे शेतीचे खूप मोठे नुकसान होणार आहे. नुकसानीला जबाबदार कोण ? असा प्रश्न पिंपरी जलसेन येथील ग्रामस्थांना पडला आहे.
पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथे राष्ट्रीय पेयजल योजना अंतर्गत नळ योजनेचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. महिन्याभरापूर्वी गावातील थोरात मळा भागात पिण्याच्या पाईप लाइन चे काम सुरू करण्यात आले होते. त्यासाठी जेसीबी मशीन च्या साहाय्याने शेतातून नळ्या टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले. महिन्याभरापुर्वी उन्हाळा असल्याने व शेतात कुठलीही पिके नसल्याने शेतकऱ्यांनी खोदकामाला परवानगी दिली. परंतु आता पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. आता शेतीच्या कामांची लगबग सुरू होणार आहे. ठेकेदाराने पाइप लाईनसाठी महिन्याभापूर्वी खोदकाम करून ठेवले असून अद्याप पाइप टाकून ते बुजून घेतले नाही. शेतातून खोदकाम करून ठेवले असल्याने शेतकऱ्यांनी शेतीची मशागत कशी करायची व शेतीची पेरणी कशी करायची कशी ? असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर उभा आहे. याबाबत शेतकऱ्यांनी वारंवार सबंधित ठेकेदाराला काम पूर्ण करण्याची मागणी केली असता उडवा उडविची उत्तरे सोडून शेतकऱ्यांना दुसरे काही मिळाले नाही. भर उन्हाळ्यात पाण्याची गरज असताना पाणी मिळाले नाही. पावसाळ्याच्या तोंडावर शेतातून नळ योजनेच्या पाइप लाईनसाठी खोदकाम केल्याने व ते अजून बुजून टाकले नसल्याने शेती करण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे शेती करायची कशी अशी समस्या शेतकऱ्यांच्या समोर आहे. ठेकदाराच्या आडमुठे धोरनामुळे शेतकऱ्याचे नाहक नुकसान होत असल्याने "उन्हाळ्यात पिण्याचे पाणी तर नाही दिले किमान पावसाळ्यात शेतीची पिके तरी घेऊद्या" अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. शेतातून खोदकाम केले असल्याने व सुगीचे दिवस असल्याने शेताची पेरणी करायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांना आहे. पिंपरी जलसेन परिसरात शेतकरी हंगामी पिके घेत असतात. त्यामुळे या पाइप लाईन लवकर बुजल्या नाही तर शेतकऱ्यांचा पिकाचा पूर्ण हंगाम निघून जाईल व शेतकऱ्यांचे नुकसान होईल. मग या नुकसानाला जबाबदार कोण ? सबंधित ठेकेदार शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई करून देणार का ? असा प्रश्न पिंपरी जलसेन मधील ग्रामस्थ व शेतकऱ्यांमधून होत आहे.
राष्ट्रीय पेयजल योजनेच्या या कामाबाबत अनेक तक्रारी असून काम पूर्ण करण्याऐवजी ठेकेदार कामावर दुर्लक्ष करून दुसरीकडे कुठेतरी मग्न असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी निघोज वरून पाणी सुरू करतेवेळी घाईघाईत सुरू केल्याने अनेक ठिकाणी पाइप लाईन गळती सुरू झाली. अनेक ठिकाणचे एअरवाल्व्ह ची देखील गळती होत असल्याचे समोर आले आहे. एका ठिकाणी तर पीव्हीसी पाइप मातीत गाडले नसून उघड्यावर असल्याने ते उन्हामुळे वितळून गेलेले आहे. त्यामुळे या कामाच्या दर्जाबाबत साशंकता असून ठेकेदाराच्या आडमुठे धोरणामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे. आता तरी पिंपरी जलसेन ग्रामपंचायतने संबधित ठेकदारावर कारवाई करण्यासाठी पुढे यावे अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद