शाळा सुरू झाल्यावर मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याबाबत चिंतेत...

0
पारनेर : कोरोना विषानूच्या साथीमुळे सर्व शाळा महाविद्यालये बंद आहेत.अशा परिस्थितीत ऑनलाईन अभ्यास घेतले जात आहेत.परंतु कुठे तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. नुकतीच केंद्रीय मनुष्यबळमंत्री रमेश पोखरीयल यांनी देशातील सर्व शाळा, महाविद्यालये १५ ऑगस्ट नंतरच सुरू होतील अशी घोषणा केली आहे. परंतु कोरोना विषाणूचा वाढत चाललेला प्रादुर्भाव पाहता पालकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.त्यामुळे शाळा सुरू झाल्यावर मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार की नाही व शाळांमध्ये किती हजेरी असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जीवघेण्या कोरोनावर औषध उपलब्ध नसताना कुणीही आपला पोटचा गोळा शाळेत पाठवायला तयार होईल असे वाटत नाही. म्हणून देशाची ही पुढची पीढी सक्षम राहिली पाहिजे याची जाणीव ठेवून सरकारने शाळा सुरू केली पाहिजे - अक्षय घोगरे

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top