वासुंदे येथील बोकनकवाडी च्या तरुणाचा अनैतिक संबंधातूनच खून .!

0
पारनेर : तालुक्यातील वासुंदे येथील बोकनकवाडीतील युवक अजित रावसाहेब मदने (वय २१) यांचा दि १४ रोजी वडगाव सावताळ जंगलामध्ये मृतदेह आढळला होता पोलीस तपासाअंती तो अनैतिक संबंधातून खून झाला असल्याची बाब समोर आली आहे याबाबत मयत तरुणाचे काका तानाजी खंडू मदने यांनी फिर्याद दिली आहे त्यानुसार पोलिस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून  २ आरोपींना अटक करण्यात आले आहे.
अवघ्या २४ तासात तपास लावून आरोपींना अटक करण्यात पोलीस प्रशासनाला यश !
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वडगाव सावताळ येथील वनविभागाच्या हद्दीत त्याचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर पोलिसांनी शोधाशोध केली मात्र या ठिकाणी विशेष काही आढळून आले नाही मात्र नातेवाईक व इतर ठिकाणी पोलिसांनी शोध घेतला त्यानुसार हा अनैतिक संशयातून खून झाला असल्याचा पोलिसांचा संशय बळावला त्यानुसार पोलिसांनी टाकळी ढोकेश्वर येथील एका जणाला व वडगाव सावताळ येथील चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीमध्ये ते माहिती लपवत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली. त्यामध्ये संतोष झावरे राहणार टाकळी ढोकेश्वर व किरण उर्फ बाळा जांभळकर या दोघांनी हा खून केला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली.
गुन्ह्याच्या तपासात पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास करून तपासाची चक्रे फिरवून गुन्ह्यातील संशयित आरोपी संतोष हरिभाऊ झावरे (वय २८) राहणार टाकळी ढोकेश्वर पारनेर यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली व नंतर विश्वासात घेऊन विचारपूस केली असता गुन्ह्याची कबुली देऊन मयत अजित रावसाहेब मदने यास संतोष हरिभाऊ झावरे यांनी त्याच्या पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधातून त्याचा आत्येभाऊ किरण जांभळकर याच्या मदतीने फॉरेस्ट एरिया मध्ये नेऊन केतकडाच्या बांबूने मारहाण करून त्याचा खून केल्याचे कबूल केले अवघ्या चोवीस तासात सदर गुन्हा उघडकीस आणला.
मयत अजित मदने यांचे काका तानाजी खंडू मदने (वय ४२) राहणार बोकनकवाडी वासुंदे ता.पारनेर जि. अहमदनगर यांनी पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी त्यांचा मयत पुतण्या अजित रावसाहेब मदने यांचे व संतोष हरिभाऊ झावरे रा टाकळी ढोकेश्वर तालुका पारनेर याची पत्नी सोबत फोनवर बोलत असल्याचे व मोबाईल मध्ये फोटो असल्याच्या संशयावरून त्याला वडगाव सावताळ येथील फॉरेस्टच्या एरिया मध्ये घेऊन जाऊन त्या अनोळखी साथीदारांसह केतकडाच्या बांबूने मारहाण करून जीवे ठार मारले आहे. अशी फिर्याद दिली त्यानुसार पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी आरोपी संतोष हरिभाऊ झावरे वय २८ टाकळी ढोकेश्वर किरण बाळासाहेब जांभळकर (वय २१) राहणार वडगाव सावताळ ता. पारनेर जि. अहमदनगर या दोघांना अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ करीत आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश गवळी, स्थानिक गुन्हे शाखेचे दिलीप पवार, पोलीस उपनिरीक्षक गणेश इंगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस कॉन्स्टेबल अण्णा पवार, बबन मखरे, भालचंद्र दिवटे, मनोज गोसावी, सत्यजित शिंदे, दत्तात्रय गव्हाणे, मेघराज कोल्हे, प्रकाश वाघ आदींनी हा शोध घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top