निघोज येथील कुंड पर्यटन क्षेत्र येथे धान्य ठेवण्याच्या मोठ्या डब्या मध्ये मृतदेह आढळून आल्याने खळबळ

0
पारनेर: तालुक्यातील निघोज येथील कुंड पर्यटन क्षेत्र येथे मोठ्या डब्या मध्ये मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. निघोज येथील जग प्रसिद्ध रांजण खळगे येथील बंधाऱ्यात मृतदेह असलेला डबा आढळून आल्याने व कुंड परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती पारनेर पोलीस स्टेशनला मिळताच पारनेरचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी घटनास्थळी जाऊन भेट देऊन पाहणी केली. 
हे प्रेत पुरुष जातीचे असून वय अंदाजे 30 ते 40 वर्तवण्यात येत आहे. मृतदेहाचा पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच पोलीस तपासाची दिशा ठरवली जाणार आहे. 
अशी माहिती पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी दिली आहे.


मृतदेह लोखंडी पेटीमध्ये असल्यामुळे काहीतरी घातपात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top