सुवर्णकला हा विशिष्ट समाजाचा पारंपरिक व्यवसाय असताना देखील या व्यवसायात मराठी माणसाने केलेली प्रगती अभिमानास्पद- आमदार निलेश लंके

0

निघोज -:- पारनेर तालुक्यातील निघोज येथील गोकर्ण ज्वेलर्सच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आमदार निलेश लंके यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत होते. सरपंच ठकाराम लंके, डॉ. सुनील कदम आदी. यावेळी उपस्थित होते. गोकर्ण ज्वेलर्सचे संचालक गोरक्षनाथ लामखडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

दोन वर्षांपूर्वी या ज्वेलरी दुकानाचे उद्घाटन निलेश लंके यांच्या हस्ते झाले होते. परंतु अल्पावधीत साधलेली प्रगती पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. या व्यवसायात प्रामाणिकपणा महत्त्वाचा असल्याने शुद्धता व प्रामाणिक जपून ग्राहकांचा विश्वास संपादन करावा असेही आमदार लंके यांनी यावेळी सांगितले.




सुवर्णकला हा विशिष्ट समाजाचा पारंपरिक व्यवसाय असताना देखील या व्यवसायात मराठी माणसाने केलेली प्रगती अभिमानास्पद- आमदार निलेश लंके

गोकर्ण ज्वेलर्सचे संचालक गोरक्षनाथ लामखडे म्हणाले की, जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाच्या बळावरच आपण या व्यवसायात धाडस केले होते. दोन वर्षात शुद्धता व प्रामाणिकपणाच्या बळावरच आपण ग्राहकांचा विश्वास संपादन केल्याचे श्री. लामखडे यांनी सांगितले.

Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top