पारनेर: तालुक्यातील निघोज येथे जिल्हा परिषद अहमदनगर महिला बालकल्याण विभागाअंतर्गत जिल्हा परिषद सदस्या श्रीमती.पुष्पाताई संदीप वराळ पाटील यांच्या प्रयत्नातून महिलांना स्वयंरोजगारासाठी पल्वलायझर(कांडप मशीन) चे वाटप संदीप पाटील वराळ फौंडेशनचे अध्यक्ष श्री.सचिनभाऊ वराळ पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष मनोहर राऊत हे होते.
तसेच याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य मंगेशदादा लाळगे, विस्तार अधिकारी यादव साहेब, ग्रामसेवक जगदाळे भाऊसाहेब, धोंडिभाऊ राऊत, प्रविण राऊत, सुंदरबाई राऊत, प्रतीक्षा राऊत, कौसाबाई सोनवणे, मंदाबाई राऊत, हिराबाई राऊत, विमलबाई राऊत, कीर्ती बळीद, माऊली वरखडे, निलेश घोडे, साजिद तांबोळी, रामा वराळ, स्वप्नील आतकर, अविनाश निचित, ओंकार दुनगुले, क्षितिज शेटे, तुषार तांबे, गणेश गजरे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद