कोरोनाचे हे संकट दूर झाल्यानंतर विकास कामांचा बॅकलॉग भरून काढणार - आमदार निलेश लंके

0

पारनेर प्रतिनिधी :- पारनेर- नगर मतदार संघातील जनतेने घरचा उमेदवार समजून निवडणूक हातात घेतल्याने आपण आमदार झालो. यावर्षी पाऊस पडल्याने पाण्याचा प्रश्न सुटला याचा आनंद झाला. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे वर्षभरात प्रत्यक्षात काम करायला चारच महिने संधी मिळाल्याचे सांगत यामुळे आपला पायगुण कसा? असा प्रश्न पडल्याचे प्रतिपादन आमदार निलेश लंके यांनी केले.



पुणेवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस व प्रतिष्ठानच्या शाखेचे उद्घाटन तसेच कोरोनाच्या काळात काम केलेल्या आरोग्य, अंगणवाडी, आशा सेविका व माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी पाणी फाऊंडेशनचे अभियंता लष्करे होते. या वेळी आमदार निलेश लंके बोलत होते.


पारनेर- नगर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अशोकराव सावंत, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब तरटे, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रदेशाध्यक्ष जितेश सरडे, माजी सभापती सुदाम पवार, माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र चौधरी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष बापू शिर्के, शहराध्यक्ष विजुभाऊ औटी, प्रा. संजय लाकूडतोडे चंद्रकांत चहाळ, बाजार समितीचे माजी संचालक मारुती रेपाळे, गोभक्त शिवाजी महाराज रेपाळे, मेजर कारभारी पोटघन, सिताराम पुजारी, संजय मते या कार्यक्रमाचे आयोजन उद्योजक दत्ता शेठ ठाणगे, अध्यक्ष संदीप मगर, ज्ञानदेव चेडे, नागेश पोटे, अक्षय चेडे, साहेबराव बोरुडे, योगेश बोरुडे, राहुल पोटे, योगेश दुष्मान, प्रवीण लांडे, रविराज रेपाळे, त्रिंबक रेपाळे, खंडू भाऊ रेपाळे, संभाजी रेपाळे, स्वप्निल दुश्मन, मदन रेपाळे, देवराम पोटे आदी निलेश लंके प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते .


यावेळी बोलताना आमदार लंके म्हणाले की,आपण आमदार झाल्यानंतर सरकार स्थापन होण्यासाठी दीड महिन्यांचा कालावधी लोटला. अधिवेशन काळात 90 ते 95 कोटी रुपयांच्या विकास कामांच्या निधीची तरतूद करून घेतली. मात्र, कामाला सुरुवात होण्यापूर्वीच कोरोनाचे संकट आल्याने विकासकामांना कात्री लागल्याची खंत व्यक्त करीत, हे संकट दूर झाल्यानंतर विकास कामांचा बॅकलॉग भरून काढणार असल्याचेही आमदार यांनी सांगितले.

Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top