माझी आमदारकी मिरवण्यासाठी कधीच नसणार !

0

पारनेर प्रतिनिधी : मी कुठल्या आमदार किंवा खासदार राजकारण्यांच्या घराण्यात जन्माला आलेलो नाही.

माझे आजवरील आयुष्य हे सामान्य जनतेच्या सुख दुःखाशी एकरूप झालेले आहे.व त्यांच्या आशीर्वादा मुळेच मी पारनेर-नगर विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत आहे.अशी साधी राहणी व उच्च विचारसरणी असणारे निलेश लंके या सामान्य आमदाराचा साधेपणा महाराष्ट्राला भावला आहे.



पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे एका लग्न समारंभाला तालुक्याचे आमदार निलेश लंके उपस्थित राहिले यावेळी आमदारांना उपस्थित वधू वरांचे फोटो काढायचा मोह आवरला नाही त्यांनी फोटोग्राफर कडून कॅमेरा घेत थेट या वधु-वरांचे फोटो काढले यावेळी उपस्थितांना या गोष्टीचे नवल वाटले मात्र आमदार लंके यांनी यापूर्वीही त्यांना ज्या गोष्टी आवडतात त्या सर्वसामान्यांमध्ये मिसळत आपले छंद आवडी निवडी जोपासले आहे यामुळे अल्पावधीतच जनतेतील आमदार म्हणून त्यांना महाराष्ट्रामध्ये नावलौकिक प्राप्त झाला आहे.

तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर मध्ये असणाऱ्या लग्नसमारंभाला आमदार लंके उपस्थित राहिले होते.यावेळी त्यांच्या समवेत जितेश सरडे,गणेश शेटे,चंद्रकांत मोढवे नंदू सोंडकर, पत्रकार शरद झावरे,सरपंच अशोक घुले, ठकाराम लंके यांच्या सह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते.

यावेळी आमदार लंके यांनी वधू-वरांचे फोटो काढत असताना फोटोग्राफर कडून स्वतः कॅमेरा हातात घेत फोटोग्राफी केली ही गोष्ट लग्नसमारंभाला उपस्थित असणार्‍या अनेकांना चांगलीच भावली.

आमदार लंके यांचे राहणीमान सर्वसामान्यांप्रमाणे आहे तसेच ते कुठलाही बडेजाव न करता सर्वसामान्यां प्रमाणेच मतदार संघांमध्ये वावरत असतात त्यांच्या याच गोष्टींची पक्षाध्यक्ष शरद पवार,खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांना अल्पावधीत भुरळ पडली आहे,एकीकडे आमदार झाल्यानंतर अनेक लोक आपले राहणीमान व्यक्तिमत्त्वात अनेक बदल करत असतात मात्र आमदार निलेश लंके याला अपवाद आहेत त्यांनी आमदार झाल्यापासून अनेक अशा समाजोपयोगी गोष्टींमध्ये आपला सहभाग नोंदवला आहे कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात एखाद्या गावात कोरोना रुग्ण सापडला तर त्या ठिकाणी जाण्यासही कोणी धजावत नव्हते  मात्र आमदार निलेश लंके यांनी आपल्या पाठीवर पंप घेऊन गावागावांमध्ये सॅनिटायझरचा स्प्रे घेतला होता त्यानंतर लॉक डाऊनच्या काळातच स्वतःबस चालवत राज्याबाहेरील काही परप्रांतीय मजुरांना नगर रेल्वे स्टेशन येथे नेऊन सोडले  सार्वजनिक ठिकाणी वावरताना लहान मुलांपासून वृद्ध आजी-आजोबांपर्यंत स्वतः विचारपूस करत असतात तसेच त्यांच्यासोबत फोटो काढत असतात. कार्यकर्त्यांनी मोटार सायकल,रिक्षा, जे.सी.बी. पासुन ट्रक पर्यंत कुठल्याही वाहनाची खरेदी केली तर त्याचे पुजन गावोगावी जात स्वतः ते वाहन चालवत स्वहाताने त्याचे पुजन करताना हा सामान्य आमदार जनतेला दैनंदीन दिसत आहे.तरुणांसोबत तर ते खांद्यावर हात टाकुन स्वतः सेल्फी काढत असतात त्यामुळे अल्पावधीतच त्यांना राज्यात  लोक सामान्यातील सामान्य लोकांचा आमदार म्हणून ओळखत आहेत. व आमदार लंके देखील त्याच पद्धतीने आपली ओळख जोपासताना दिसत आहेत.आपल्या आवडी निवडी छंद ते अशा पद्धतीने जोपासत आहेत. लोकांमध्ये मिसळत असतात लोकांचे प्रश्न समजावून घेऊन ते त्याच ठिकाणी सोडविण्याचे काम ते वेळोवेळी करत आहेत.त्यामुळे त्यांचा वेगळाच नावलौकिक आहे.

आमदार लंके हे कधीही आमदारकीचा किंवा स्वतःचा बडेजाव करत नाहीत तर अनेक वेळा लग्न समारंभा मध्ये साध्या पद्धतीने ते उपस्थित राहत असतात या लग्न समारंभामध्ये त्यांनी स्वतः फोटोग्राफी केली तसेच अनेक कार्यक्रमांमध्ये ते स्वतः लोकांना जेवण वाढण्याचे काम करत असतात तालुक्याला अतिशय साधा आमदार लाभला आहे अशा प्रतिक्रिया जनसामान्यांमध्ये उमटत आहेत.

अल्पावधीतच राष्ट्रवादी काँग्रेसचा जनतेचा चेहरा म्हणून आमदार लंके यांची नवी ओळख तयार होत आहे.स्वर्गीय आर. आर.पाटील यांच्या नंतर राष्ट्रवादी कडून आमदार लंके यांच्याकडे जनतेत मिसळणारा आमदार म्हणून पाहिले जात आहे. तसे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी देखील अनेक वेळा उल्लेख केला आहे मतदार संघात त्यांच्या या कार्यपद्धतीबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top