निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी श्री.दत्तात्रय रंभाजी लंके यांना गौरवमुर्ती कामगार म्हणुन पुरस्कार

0

पारनेर: तालुक्यातील निघोज येथील निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी श्री.दत्तात्रय रंभाजी लंके यांना राज्यस्तरीय कामगार आयटक संघटनेला १०० वर्षे पुर्ण झाल्याबद्दल कामगार संघटनेच्या वतीने त्यांना गौरवमुर्ती कामगार म्हणुन पुरस्कार मिळाला. त्यामुळे निघोज नागरी सहकारी पतसंस्था परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. वसंत कवाद, उपाध्यक्ष मा.श्री. नामदेव मामा थोरात यांच्या हस्ते दत्तात्रय लंके यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे  संचालक मा. श्री. भिवाशेठ रसाळ, श्री बाबाजी लंके, निघोज पतसंस्थेचे कर्ज वितरण अधिकारी सत्यवान गुंड, शाखाधिकारी अर्जुन ढवळे, वरिष्ट अधिकारी शांताराम सुरकंडे, सुनिल तांबे , बाळासाहेब बोरूडे , व सर्व कर्मचारी वृंद या वेळी उपस्थित होते .





Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top