भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अभिवादन केले.

0

 मुंबई, दि. 15:- भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अभिवादन केले.

 

‘स्वातंत्र्य प्राप्तीनंतर पहिले पंतप्रधान म्हणून जवाहरलाल नेहरु यांनी देशाच्या विकासाचा सर्वसमावेशक असा मार्ग आखून दिला. त्यामुळेच जागतिक पातळीवर आज देशाने वेगळी ओळख निर्माण केली आहे.’ असे अभिवादन करतानाच मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी बाल दिनाच्याही शुभेच्छा दिल्या आहेत.

 


मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

 

स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशाला विकास मार्गावर नेण्याचे आव्हान होते. पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी पहिले पंतप्रधान म्हणून हे आव्हान पेलले. त्यांनी विकासाचा सर्वसमावेशक असा मार्ग आखून दिला. त्यांच्या दूरदृष्टीमुळे देशाच्या विकास धोरणात शिक्षण-संशोधन आणि विज्ञान-तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला. उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्यात आले. यामुळेच आज विकसनशील देश म्हणून भारताने जागतिक पातळीवर आपली अशी ओळख निर्माण केली आहे - मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे

 

पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या जन्म दिनानिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या ‘बाल दिना’ च्या मुख्यमंत्री श्री. ठाकरे शुभेच्छा दिल्या आहेत. यानिमित्ताने मुलांमधील बालसुलभ कुतूहल जपताना त्यांच्यामध्ये जागतिक परिस्थिती आणि देशप्रेम याबाबतचे भान संवेदनशीलतेने पेरावे लागेल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

 

Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top