पारनेर: तालुक्यातील निघोज येथील श्री. मुलिकादेवी महाविद्यालयात मोठ्या उत्साहात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त १५ ऑक्टोबर हा दिवस "वाचन प्रेरणा दिन" म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने महाविद्यालयाच्या वतीने डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सहदेव आहेर यांनी उपस्थितांना वाचनाचे महत्व सांगितले. पुस्तक वाचकाच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतं. पुस्तकाचे एक पान एखाद्याचे आयुष्य बदलू शकतं आणि एक वाक्य एखाद्याच्या आयुष्याचं ध्येय ठरवू शकतं. एवढी ताकद वाचनात आहे. तेव्हा सर्वांनी नियमित पुस्तकाचे वाचन करणे आवश्यक आहे. तसेच अब्दुल कलाम आजही आपल्या प्रेरणादायी विचार आणि कार्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या कार्याचा आदर्श सर्वांनी घेणे आवश्यक आहे असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सहदेव आहेर यांनी व्यक्त केले.
श्री मुलिकादेवी महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
ऑक्टोबर १५, २०२०
0
विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून कोरोना संसर्गाच्या कालावधीत महाविद्यालयाने दैनंदिन अभ्यासक्रम सुरू केला आहे. सदर अभ्यासक्रम हा व्हॉट्स ऍप, झूम ऍप, गूगल क्लासरूम इ. माध्यामातून ऑनलाईन शिक्षणाची सुविधा महाविद्यालयाने उपलब्ध करून दिला आहे.याचा मोठ्या प्रमाणात विद्यार्थी लाभ घेत आहेत असे डॉ.आहेर यांनी सांगितले.
यावेळी डॉ. मनोहर एरंडे, प्रा. मनिषा गाडीलकर, डॉ.पोपट पठारे, डॉ. गोविंद देशमुख, प्रा. अशोक कवडे, प्रा.राम खोडदे, प्रा.शामराव रोकडे, प्रा.आनंद पाटेकर, प्रा.अंजली मेहेर, प्रा.निलिमा घुले, प्रा.प्रिती कार्ले, प्रा. प्रविण जाधव, श्री. नवनाथ घोगरे आदि प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Tags
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद