निघोज: पारनेर तालुक्यातील निघोज येथिल मुख्यालय असलेल्या विघ्नहर्ता पतसंस्थेने अल्पावधीतच गरुड झेप घेतली आहे. सभासद, खातेदाराच्या विश्वासास पात्र ठरून अवघ्या ४५ दिवसांमध्ये ५ कोटी २५ लाख रुपयाच्या ठेवी जमा झाल्या असल्याची माहीती संस्थेचे अध्यक्ष सुभाष रामचंद्र साठे यांनी दिली. संस्थेचे अध्यक्ष सुभाष साठे यांनी २३ वर्ष सहकार क्षेत्रामध्ये अतिशय चांगले प्रभावीपणे कार्य केले आहे. आपल्या ज्ञानाचा व सहकार क्षेत्रातील कामाच्या अनुभवामुळे तसेच त्यांच्या पत्नी सौ.शैला सुभाष साठे या गाडीलगाव, गुणोरे गावचे सरपंच होत्या. त्यामुळे त्यांच्या काळात त्यांनी गावचा कारभार पारदर्शी व प्रामाणिकपणे करून जनतेच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले आहे. गेली कित्येक वर्षे कुकडी कॅनॉलचे पाणी लाभधारक शेतकऱ्यांना आपल्या शेतीसाठी वेळेवर मिळावे म्हणून नेहमी प्रयत्नशील राहिले. त्यांनी आपल्या नि:स्वार्थ कामाचा ठसा जनतेत उमटवल्यामुळेच जनतेने त्यांच्या नव्यानेच स्थापन केलेल्या पतसंस्थेने अवघ्या ४५ दिवसांतच ५ कोटी २५ लाखाच्या ठेविचा टप्पा पार करण्यात यश मिळवले. पतसंस्थेतील सर्व कर्मचारी अनुभवी व प्रशिक्षीत असून ते संगणकीकृत असलेल्या संस्थेच्या माध्यमातून सर्व सभासद, खातेदारांना अतिशय चांगल्या प्रकारे सेवा देत आहेत. त्यामुळे आज अखेर संस्थेचे भागभांडवल ठेवी-५ कोटी २५ लाख, कर्ज वाटप-२ कोटी २७ लाख, गुंतवणूक-१ कोटी ९० लाख झाली असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन श्री. सुभाष साठे यांनी News महाराष्ट्र दर्शनशी बोलताना दिली.
आपण आमच्यावर जो विश्वास दाखवला त्यामुळेच आपली सर्वांची पतसंस्था अल्पावधीतच जनतेच्या विश्वासास पात्र ठरून आज प्रगती पथावर आहे.असाच ठाम विश्वास दाखवून "एकमेका साह्य करू,अवघे धरू सुपंथ" या संतवचनाप्रमाणे संस्थेचा व आपल्या सर्व सभासद,खातेदारांचा विकास नक्कीच करू - श्री.सुभाष साठे ( संस्थेचे चेअरमन)
या संस्थेच्या सभासदांना, खातेदारांना, गोरगरीब जनतेला सेवा देण्याचे काम यापुढील काळातही जोमाने करणार असून "जनसेवेचे पुण्यं आगळे त्यात असे भगवान मानवा साधून घे कल्याण" या संत वचना प्रमाणेच संस्थेने खातेदारांसाठी आर.टी.जी.एस.सुविधा, एस.एम.एस.सुविधा, मोबाईल बँकिंग, चेक क्लेअरिंग, वेगवेगळ्या कर्ज सुविधा चालू करण्यात आलेल्या आहेत. पंचक्रोशीतील सर्व गोरगरीब, शेतकरी, व्यावसायिक, उद्योजक, नोकरदार यांनी आजच आपले खाते विघ्नहर्ता पतसंस्थेत सुरू करून आपण आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन संस्थेचे चेअरमन श्री.सुभाष साठे, व्हा.चेअरमन श्री.भाऊसाहेब मदगे व सर्व संचालक मंडळ,कर्मचारी वर्ग यांनी केले आहे.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद