पारनेर नगर मतदार संघाचे राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष पदी पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे मा. अध्यक्ष अशोकरावजी सावंत यांची वर्णी
पिंपळनेर -राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके, आमदार लोकनेते निलेशजी लंके यांच्यासह अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या अनेक नेते मंडळी व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत श्री.अशोकराव सावंत यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या पुरोगामी विचाराचा स्वीकार करत जिल्ह्यातील पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तसेच राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, खासदार सुप्रिया ताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार संघातील विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहनारे व्यक्तिमत्त्व म्हणून अशोकराव सावंत यांची निवड करण्यात आली असल्याचे जिल्हाध्यक्ष फाळके यांनी सांगितले .
राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव पाहता त्यांच्या कौशल्याचा उपयोग मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटन मजबूत करण्यासाठी होईल असा आशावाद जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके व आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केला, व त्यांच्या भावी कार्यास आमदार लंके यांच्या सह उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद