आ. लंकेच्या आवाहनाला अ‍ॅड. उदय शेळके देतील का साथ...

0

पारनेर : (चंद्रकांत कदम) तालुक्यातील ८८ ग्रामपंचायत निवडणुका १५ जानेवारी ला होणार आहेत. तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा, शासनाचा खर्च वाचवा व गावात एकात्मता व शांतता ठेवा व गावासाठी २५ लाखांचा निधी मिळवा असे आवाहन पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी पारनेर तालुक्यातील नागरिकांना व गावपुढाऱ्यांना केले आहे. त्यामुळे पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन या गावामध्ये राष्ट्रवादीचे नेते व महानगर बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड. उदय शेळके हे आ. लंकेच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन पिंपरी जलसेन ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करणार का ? हे पाहणे पारनेरकरांसाठी औत्सुक्याचे झाले आहे.



गावपातळीवरच्या निवडणुका म्हटल्या की, दोन गट तयार होतात, गटबाजी नंतर हाणामाऱ्या होतात, भावकी भावकित वाद होऊन जन्मभराची दुश्मनी तयार होते. व त्याचा परिणाम गावच्या विकास कामांवर होतो. हे सर्व टाळण्यासाठी व गावचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी पारनेर तालुक्याचा कुटुंब प्रमुख या नात्याने तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्यासाठी मी स्वतः प्रत्येक गावातील सर्वपक्षीय प्रमुख पुढाऱ्यांशी बोलून समेट घडवून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तालुक्यातील निवडणुका बिनविरोध निवडणूक करणाऱ्या गावांसाठी २५ लाखांचा निधी देणार असल्याचे देखील आ. लंके यांनी जाहीर केले आहे. पिंपरी जलसेन हे गाव पारनेर तालुक्याच्या राजकीय दृष्ट्या महत्वाचे समजले जाणारे गाव. राष्ट्रवादीचे दिवंगत नेते स्व. गुलाबराव शेळके व महानगर बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड. उदय शेळके यांचे गाव. आणि या पिंपरी जलसेन गावच्या बिनविरोध निवडणुकीसाठी आ लंकेच्या आवाहनाला अ‍ॅड. उदय शेळके साथ देणार का ? पिंपरी जलसेन ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करणार का ? अशी चर्चा पारनेर तालुक्यातून होऊ लागली आहे. त्यामुळे अ‍ॅड. उदय शेळके यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top