पारनेर:(वार्ताकन : चंद्रकांत कदम) तालुक्यातील पिंपरी जलसेन मधील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल नुकताच लागला असून ९ जागेसाठी झालेल्या निवडणुकीत महानगर बँकेचे अध्यक्ष उदय शेळके यांच्या गटाकडे ३ जागा तर विरोधी रोकडेश्वर महाविकास आघाडी गटाकडे ६ जागा निवडून आल्या आहेत. गेल्या २५ ते ३० वर्षांपासून शेळके गटाकडे असणाऱ्या ग्रामपंचायत मध्ये सत्तांतरण झाले असून आता महाविकास आघाडी गटाकडे सत्ता आली आहे.
अतिशय अटीतटीच्या व चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत ९ जागेसाठी दोन्ही गटाकडून १८ व अपक्ष ५ असे २३ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये मुख्यत्वे लढत ही दोन्ही गटांमध्ये झाली व अपक्षांना १४,२०,३४ अशी मते पडली. प्रभाग क्रमांक एक मधून विद्यमान उपसरपंच संदीप काळे यांच्या पत्नीचा पराभव होऊन त्याठिकाणी महाविकास आघाडीच्या वर्षा भाऊसाहेब पानमंद, सीताबाई अरुण कदम व अश्विनी रमेश भिंगारदिवे या निवडून आल्या. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक २ मध्ये उदय शेळके गटाचे अभिमन्यू प्रभू थोरात व दीपाली प्रकाश वाढवणे या तर महाविकास आघाडी गटाच्या मीनाक्षी संतोष थोरात या निवडून आल्या. शेळके गटाचा बालेकिल्ला असणाऱ्या प्रभाग ३ मधून विद्यमान सरपंचाच्या सूनबाईचा पराभव होऊन सर्वसामान्य कुटुंबातील मंगल चंद्रकांत शेळके व सुरेश काळे यांचा विजय झाला. व शेळके गटाचे सचिन दत्तात्रय शेळके हे निवडून येऊन शेळके गटाला स्वतःच्या बालेकिल्ल्यात १ जागेवर विजय राखता आला.
रोकडेश्वर ग्रामविकास पॅनलचे नेतृत्व महानगर बँकेचे अध्यक्ष उदय शेळके, माजी सरपंच लहू थोरात, तुकाराम कदम यांनी केले तर विरोधी रोकडेश्वर महाविकास आघाडी पॅनल चे नेतृत्व अप्पासाहेब कदम, भास्कर थोरात, दगडू बोरुडे, शांताराम कदम, चंद्रकांत कदम, विनोद कदम, जयसिंग कदम, बाबाजी वाढवणे, राजेंद्र काळे, दगडू थोरात, बबन घेमुड आदींनी केले. विजयी उमेदवारांचे आमदार निलेश लंके, माजी सभापती राहुलभैय्या झावरे, पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांत पठारे यांनी अभिनंदन केले.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद