छत्रपती शिवरायांचे विचार डोक्यावर नाहि तर डोक्यात घ्यावे - डॉ भास्कर शिरोळे

0

पारनेर: निघोज येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती कोरोनाचे नियम पाळून साजरी करण्यात आली. निघोज व परीसरात सध्या कोरोना जोर धरत असल्याचे चित्र आहे. म्हणून गेले १५ वर्षापासून मोठ्या जल्लोषात साजरी होणारी शिवजयंती महोत्सव मात्र यावर्षी साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे व पदाधिकाऱ्यांनी घेतला होता. त्यानुसार कार्यक्रम पार पडला. सकाळी ९ वाजता डॉ. भास्कर शिरोळे, गणेश लामखडे, रमेश वरखडे, बबन ससाणे, किसन लामखडे, बबन तनपुरे, निवृत्तीमहाराज तनपुरे, संतोष रसाळ, राजु लाळगे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन व आरती करण्यात आली.

त्यानंतर मागील शिवजयंती निमित्ताने करण्यात आलेला वैकुंठरथाचा संकल्प यावेळी पुर्ण झाल्याने वैकुंठरथाचा लोकार्पण सोहळा माता मळगंगा मंदिरासमोर डॉ.भास्कर शिरोळे, शांताराम मामा लंके, प्रभाकर शेठ कवाद, आप्पाशेठ लामखडे, निवृत्ती महाराज तनपुरे यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला.

डॉ. भास्कर शिरोळे यांनी शिवबा संघटनेच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक करून शिवविचाराने काम करणाऱ्या बरोबर नेहमीच असु व यापुढिल काळात गावाने सामाजिक कार्यासाठी संघटनेबरोबर उभे राहावे असे आवाहन केले. 

या कार्यक्रम प्रसंगी रोहिदास लामखडे, राहुल शेटे, खंडु लामखडे, शंकर वरखडे, स्वप्नील लामखडे, शांताराम लामखडे, विश्वास शेटे, निलेश वरखडे, अभय शेटे, एकनाथ शेटे, अविनाश लामखडे, गोपी वरखडे, शैलेश वरखडे, अंकुश वरखडे, पोपट वरखडे, विशाल खैरे, निखिल वरखडे, मच्छिंद्रनाथ लाळगे, बाबाजी लामखडे, विशाल लामखडे, कुंडलिक लामखडे, अमोल लामखडे, रोहन वरखडे, दिलीप कवाद आदी सहकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.







टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2



#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top