शिरूर (प्रतिनिधी- किरण चौधरी) : COVID 19 जागतिक वैश्विक महामारीमुळे २०२० मध्ये संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित केले. त्याचा परिणाम प्रत्येकाच्या जीवनावर झाला जसे काही बिकट आर्थिक परिस्थिती, अनेकांचे रोजगार/ नोकरी गेली, नवोदित तरुणांना (फ्रेशर्स विद्यार्थी) नोकरीच्या संधी भेटेना, मोठ्या प्रमाणात परप्रांतीय आपल्या मूळ गावी परत गेले.
वरील सर्व परिस्तिथी पाहता आस्थापनांना उत्पादन करण्याकरता मनुष्यबळाची कमतरता जाणवू लागली.
Haier Appliance India Pvt Ltd आस्थापनेत , Human Resource विभागातील अजिंक्य वारे यांनी महाराष्ट्र राज्य नवोदित तरुणांना (फ्रेशर्स विद्यार्थी) मोठी नोकरीच्या संधी देत असताना अस्तापनीची मनुष्यबळाची मागणी आणि पुरवठा या मध्ये सांगड जुळवली.
लॉकडाऊन काळात सर्वाधिक (३०७४) फ्रेशर तरुणांना नोकरीची संधी दिली ह्या जागतिक विक्रमाची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस्, लंडन येथे घेण्यात अली तसे प्रमाणपत्र अजिंक्य वारे याना देण्यात आले.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद