कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदवीका अभ्यासक्रमात देविदास हरिभाऊ लेंभे यांचा राज्यात दुसरा क्रमांक

0

निघोज: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदवीका अभ्यासक्रमात निघोज (ता. पारनेर)येथील देवीदास हरिभाऊ लेंभे राज्यात दुसरा क्रमांक आला आहे. त्यांना 86.12% गुण मिळाले आहेत. विविध अभ्यासक्रमात राज्यात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांचा दर वर्षी नाशिक येथे विद्यापीठाच्या प्रांगणात राज्यपालांच्या हस्ते सत्कार होत असतो. मात्र यंदा कोरोना मुळे सत्कार समारंभ रद्द झाला आहे. विद्यापीठाच्या वतीने लेंभे देविदास हरिभाऊ यांना पोस्टाद्वारे प्रा. के. वाय. सोनवणे स्मृती पारितोषिक प्रमाणपत्र व दोन हजार एक रुपयांचा धनादेश पाठविण्यात आला आहे. हा पदवीका अभ्यासक्रम लेंभे देविदास यांनी विदयापीठाच्या नारायणगाव येथील तात्यासाहेब भुजबळ कृषी शिक्षण संकुल या अभ्यासकेंद्रातून पूर्ण केला आहे. अभ्यास केंद्राचे केंद्र संयोजक प्रा. बी. आर. भुजबळ, प्राचार्य आर. एन. गायकवाड, विषय शिक्षक प्रा.चिराग भुजबळ, प्रा.जाधव, डॉ.सत्यवान थोरात यांनी त्यांना मार्गदर्शन केले. या यशाबद्दल निघोज परिसर कृषी फोलोद्यानचे चेअरमन चंद्रकांत लामखडे व व्हा. चेअरमन अमृताशेठ रसाळ व निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन वसंत कवाद सर यांनी लेंभे देविदास यांचे अभिनंदन केले आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top