श्री. मुलिकादेवी महाविद्यालयात शिवस्वराज्यदिन उत्साहात साजरा

0

निघोज: शिवराज्याभिषेकदिनाचे औचित्य साधत श्री मुलिकादेवी महाविद्यालय, निघोज येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३४८ वा शिवराज्याभिषेकदिन हा शिवस्वराज्यदिन सोहळा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करुन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.के.आहेर, प्रभारी प्राचार्य मनोहर एरंडे, प्रा.विशाल रोकडे, प्रा.अशोक कवडे, प्रा.आनंद पाटेकर, प्रा.मनिषा गाडीलकर, प्रा.अश्विनी सुपेकर, प्रा.स्वाती मोरे, प्रा.दिपाली जगदाळे, श्री.संदिप लंके इत्यादी मंडळी उपस्थित होते.

शिवस्वराज्यदिनाच्या निमित्ताने माहाविद्यालयातील इतिहास विभागाच्या वतीने 'शिवराज्याभिषेक : शिवस्वराज्यदिन' या विषयावर विशेष अॉनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी  टाकळी ढोकेश्वर येथील शिवविचारव्याख्याते श्री.मोहन माने यांनी शिवचरित्रातील दाखले देत शिवकालीन अविस्मरणीय प्रसंग डोळ्यांसमोर जिवंतपणे उभे केले. यावेळी ते म्हणाले की, शिवस्वराज्य हे शिवराज्याभिषेकाने अधिकृत व अनभिषीक्त झाले म्हणूनच शिवराज्याभिषेकदिन हा शिवस्वराज्यदिन म्हणून साजरा करणे हा प्रत्येकाचा इष्ट धर्म आहे.  याप्रसंगी प्राचार्य डॉ. सहदेव आहेर यांनी अध्यक्ष स्थानाहून बोलताना शिवस्वराज्य हे रयतेचं स्वतःच राज्य होतं व शिवराय हे रयतेचा जाणता राजा होते अस मत व्यक्त केल. या अॉनलाईन व्याख्यानाचा सत्तरहून अधिक लोकांनी लाभ घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्तविक, सुत्रसंचलन व आभार इतिहास विभागप्रमुख प्रा.विशाल रोकडे यांनी केले.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top