स्वातंत्र्योत्तर काळातील भारत दृतगतिमान आहे - डॉ. रवि सातभाई

0

निघोज: भारत हे राष्ट्र स्वातंत्र्योत्तर काळातील ७५ वर्ष पुर्ण करत आहे. ही आपणांस भारतीय म्हणून गौरवाची बाब आहे. भारताचा विकास स्वातंत्र्यपूर्व काळाकडे पाहता स्वातंत्र्योत्तर काळात अतिशिघ्र व दृतगतीने झाला म्हणूनच आपला भारत हा दृतगतिमान आहे असे मत डॉ. रवि सातभाई यांनी व्यक्त केले. श्री मुलिकादेवी महाविद्यालय निघोज येथे इतिहास व हिंदी विभागाच्या वतीने 'स्वतंत्र भारताचे ७५ वर्षे' या विषयावर एक दिवसीय अॉनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी डॉ. सातभाई  बोलत होते. 

          या अॉनलाईन कार्यशाळेत राज्यभरातील शंभरपेक्षा अधिक संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवला. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. मनोहर एरंडे यांनी स्वातंत्र्यपूर्व ते स्वातंत्र्योत्तर भारताची यशोगाथा सांगितली. प्राचार्य डॉ. सहदेव आहेर यांनी स्वतंत्र भारताची वाटचाल सांगताना भारत हा तरुणांचा देश आहे व अल्पावधीतच भारत जगातील तीसरी महासत्ता बनेल असे मत त्यांनी व्यक्त केले. 

         या अॉनलाईन कार्यशाळेचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन इतिहास विभागप्रमुख प्रा. विशाल रोकडे यांनी केले तर आभार हिंदी विभागप्रमुख प्रा. मनिषा गाडीलकर यांनी मानले.



Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top