जीवनात संकटाचा मुकाबला करायचा असेल तर छञपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचा - डॉ.भास्करराव शिरोळे

0

निघोज : पारनेर तालुक्यातील निघोज येथील मोहन जयवंत कवाद यांच्या जिजामाता सर्व्हिस सेंटरला रात्रीच्या वेळी अचानक आग लागल्याने त्यामध्ये कवाद यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.त्यामध्ये सर्विस सेंटर मधील सर्व साहित्य जाळून खाक झाले. जिजामाता सर्विस सेंटर जळल्याची माहिती वैदयकिय क्षेत्रात व सामाजिक बांधिलकी जपणारे डाॕ.भास्करराव शिरोळे, उदयोजक गणेश कवाद, लोकमत तालुका प्रतिनिधी विनोद गोळे  मिञपरिवार उदयोजक धीरज महांडुळे,रायभान औटी, कल्याणराव थोरात यांना समजताच सर्वांनी मिळुन मोहन जयवंत कवाद यांच्या घरी येवुन ५७,५०० रुपयांची मदत त्यांना दिली.

यावेळी मोहन कवाद यांच्या मातोश्री यमुनाबाई कवाद, पञकार भास्कर कवाद, अक्षय कवाद, अभिजीत कवाद, आदित्य कवाद, तेजस कवाद, सत्यम कवाद, शिवम कवाद, गौरव कवाद, मनोज डेरे, ज्योती कवाद, राजश्री कवाद, अर्चना कवाद उपस्थित होते. कवाद कुटुंबाच्या वतीने अक्षय कवाद यांनी सर्वांचे आभार मानले.    

संकट छोटे असो की मोठे एकमेकांना आधार देणे आपले कर्तव्य आहे. सामाजिक जीवनात काम करत असताना कवाद कुटुंबांसारखी सरळ जीवन जगणारे कष्टावर विश्वास ठेवणारे माणसे जोडणे मला नेहमीच आवडते. तुम्हांला कोणतीही मदत लागली तर हक्काने आवाज दया.- डाॕ.भास्करराव शिरोळे

आपण सामाजिक जीवनात कितीही सक्षम असलो तरी अशा वेळी केलेली मदत ही आपल्याला संकटांना तोंड देण्यासाठी प्रोत्साहन देत असते हा छञपती शिवाजी महाराजांचा इतिहास असल्याचे सांगितले.- शिवव्याख्याते प्रा.ज्ञानेश्वर कवाद (पुणे विदयापीठ बहिःशालचे प्रवक्ते )

आमच्या सर्व मिञपरिवाराचे पञकार भास्कर कवाद, व्यावसायिक मोहन कवाद, शिवव्याख्याते प्रा.ज्ञानेश्वर कवाद यांच्या कुटुबांबरोबर आमचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे सबंध आहे. त्यामुळे घटनेची माहीती समजाताच कवाद कुटुंब प्रत्येक संकटाशी लढण्यास सक्षम असले तरी संकटात एकमेकांना आधार देणे हेच खरे जीवन आहे.- विनोद गोळे(लोकमतचे पारनेर तालुकाप्रतिनिधी)

जीवनात आलेल्या संकटात एकमेकांना सहकार्य करा हेच आमचे चुलते आधारस्तंभ स्व.गंगारामशेठ कवाद हे आम्हांला कायम सांगत असत. त्यांचेच विचार आम्ही जपत आहोत.- गणेश कवाद (उदयोजक ग्रामपंचायत सदस्य )

जीवनात आमच्या कुटुंबानी अनेक मोठीमोठी संकटे पाहिले आहेत. आमच्यासाठी हे संकट काहीच नाही. खचुन न जाता संकटाशी लढण्याची तयारी ठेवा आज ना उदया मार्ग निघत असतो.- यमुनाबाई कवाद 

              






Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top