अहमदनगर : कोरोनाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी शासन स्तरावर लसीकरण मोहीम राबवली जात आहे. समाजातील अनेक दिव्यांग बांधवांना लसीकरण करण्यासाठी केंद्रावर जाण्यास अडचणी निर्माण होत आहे. हे ओळखून दिव्यांग बांधवांना मदत करण्याचे ठरवले आहे. अहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीचा जिल्हाध्यक्षा राजेश्वरी कोठावळे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी लसीकरण मोहीम राबविण्याचे ठरवले असून त्यांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात असे म्हटले आहे की, अहमदनगर जिल्ह्यातील दिव्यांग (अपंग, मतिमंद, अंध, मूकबधिर) व्यक्तींना लसीकरण करून घेण्यासाठी कुठलीही अडचण जाणवत असेल तर आमच्याशी संपर्क साधावा आम्ही दिव्यांग व्यक्तींसाठी आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात एक दिवसीय लसीकरण मोहीम राबविणार त्यामुळे दिव्यांगांना प्राधान्याने लसीकरण करता येईल.
राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा कु.सक्षणाताई सलगर यांच्या सूचनेनुसार व आमदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांगांच्या लसीकरण्यासाठी पुढाकार घेणार आहोत. दिव्यांगांना लसीकरण केंद्रा पर्यंत नेण्यापासून ते दिव्यांगांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यापर्यंत आम्ही पुढाकार घेत आहोत. कोणी दिव्यांग व्यक्ती आपल्या संपर्कात असेल त्यांना लसीकरणासाठी कुठली अडचण असल्यास आमच्याशी संपर्क करावे असे आव्हान अहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्षा राजेश्वरी कोठावळे यांनी केले.
![]() |
जीवनात संकटाचा मुकाबला करायचा असेल तर छञपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचा - डॉ.भास्करराव शिरोळे |
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद