पारनेर : शेतकऱ्यांचा सखा, सोबती , प्रत्येक सुख दुःखात सहभागी असणारा, धन्यासाठी वर्षभर राबणाऱ्या सर्जा - राजाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा सण साजरा केला जातो .
पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर, भाळवणी, निघोज, कर्जुले हर्या, वासुंदे, कान्हुर पठार, पारनेर शहर सावरगाव, या ठिकाणी मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यात आला.
हे पण वाचा: राज्यातील पंधरा लाखांवर शेतकऱ्यांनी केले ई-पीक पाहणी ॲप डाऊनलोड
श्रावण अमावास्येला पोळा साजरा करण्याची पद्धत महाराष्ट्रातील बहुतांशी भागात पूर्वापार चालत आलेली आहे. श्रावण महिन्यातील व्रत - वैकल्ये , सण उत्सव यांना धार्मिक महत्त्व आहे, तसे ते शास्त्रीय, व्यवहारिक, नैसर्गिक, कृषी यादृष्टिने ते महत्त्वाचे आहेत. महाराष्ट्रात बैलपोळयाचा हा सण साजरा झाला. याच दिवशी पिठारी अमावस्या आणि श्रावणातला शेवटचा पाचवा सोमवार आहे. यामुळे या दिवसाला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. श्रावणी अमावास्येच्या दिवशी शेतकरीवर्ग पोळा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतो. प्रदेशपरत्वे हा सण आषाढ महिन्यात मूळ नक्षत्र असलेल्या दिवशी किंवा श्रावण अथवा भाद्रपद महिन्याच्या अमावास्येला साजरा करतात. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये हा सण साजरा केला जातो. मात्र, परंपरा आणि मान्यतांनुसार, तिथी आणि वेळा भिन्न असतात. या सणाचे शेतकरीवर्गात विशेष महत्त्व आहे. कोरोना महामारीच्या काळामध्ये बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पाहायला मिळालं.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद