मुक्ताबाई विद्यालय समुद्रपूर येथे वाचन प्रेरणा दिन उपक्रम साजरा.

0

समुद्रपूर- समुद्रपूर जिल्हा वर्धा येथील स्थानीक रवींद्रनाथ टागोर बहुउद्देशीय शिक्षण संस्था, पुलगाव द्वारा संचालित मुक्ताबाई विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय समुद्रपूर येथे आज दिनांक 15 ऑक्टोंबर 2021 रोजी भारताचे थोर शास्त्रज्ञ माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर ए. पी. जे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा साजरा करण्यात आला. स्थानीक रवींद्रनाथ टागोर बहुउद्देशीय शिक्षण संस्था, पुलगाव द्वारा संचालित मुक्ताबाई विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय समुद्रपूर जिल्हा वर्धा येथे आज दिनांक 15 ऑक्टोंबर 2021 रोजी भारताचे थोर शास्त्रज्ञ माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर ए. पी. जे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. शरद वांढरे (समुपदेशक) प्रमुख अतिथी म्हणून प्रशांत पांढरे, सुनील घुडे, गजानन कडू, सुहास शिरपूरकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

पृथ्वी रणनीतिक पुष्ठभागापासून पुष्ठभागापर्यंत क्षेत्रणास्त्र या मिशन अंतर्गत अनेक क्षेत्रणास्त्र विकसित करणात कलाम यांनी मोठी भूमिका बजावली.- शरद  वांढरे(मुख्याध्यापक)

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिता जवादे तर आभार प्रदर्शन साधना पवार यांनी मानले कार्यक्रमाला यशस्वितेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी सहकार्य केले.




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top