पारनेर: तालुक्यातील निघोज कुंडपर्यटनस्थळ येथे शिवबा संघटना पदाधिकारी व प्रमुख सहकार्यांची बैठक पार पडली. यावेळी विविध विषयावर चर्चा झाली. सामाजिक विषयावर व सर्वसामान्य जनतेसाठी अधिक आक्रमकपणे काम करण्याचे धोरण यावेळी ठरले.
यावेळी संघटना वाढीसाठी रणनीती आखण्यात आली. दुर्गसंवर्धन, तरुणांच्या रोजगारासाठी प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. त्यासाठी शिवबा उदयोगसमुहाची स्थापना करण्याबाबत सकारात्मक चर्चा पार पडली.
यावेळी सर्वानुमते शिवबा संघटना शिरूर तालुका प्रमुखपद मा. सोमानाथ भाकरे, शिवबा युवक संघटना शिरूर तालुकाप्रमुखपदी मा. केशव शिंदे, शिरूर तालुका सोशल मिडिया प्रमुखपद मा ऋषीकेश शेटे यांची निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे शिवबा दुर्गसंवर्धन परीवाराच्या प्रमुखपद मा. विलास कुरुंदळे, राजु भाऊ लाळगे, दत्ता टोणगे, अमोल ठुबे आदिची निवड करण्यात आली.
यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार शिवबा संघटना अध्यक्ष व सहकार्यांच्या वतीने करण्यात आला. यावेळी विदयार्थी उपतालुका प्रमुख यश राहाने, शंकर पाटील वरखडे, नवनाथ बरशिले, अभिजीत भाकरे, डॉ.दौलत पांढरकर, शेतकरी संघटना प्रमुख जयराम सरडे, सुरज शिरसाट, विदयार्थी गणप्रमुख रोहित मोरे, पारनेर शहर प्रमुख निलेश दरेकर, आदिनाथ भाकरे, मयूर दांबोरे आदि सहकारी उपस्थित होते.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद