" श्री साईनाथ विद्यालयात ८६४ विद्यार्थ्यांचे लसीकरण"

0

निघोज / प्रतिनिधी:  कोरोना नियंत्रणासाठी १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी जिल्ह्यात सोमवारी (दि.३) लसीकरण मोहिमेस सुरुवात झाली. रयत शिक्षण संस्थेच्या श्री साईनाथ विद्यालयातील ८६४ विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. आरोग्य अधिकारी डॉ.संदीप देठे यांच्या मार्गदर्शनाखाली ही लसीकरण Vaccination  मोहिम राबविण्यात आली. 

याप्रसंगी डॉ.देठे यांनी विद्यार्थ्यांना लसीकरण व घ्यावयाची काळजी विषयावर मार्गदर्शन केले. तसेच मास्क, सॅनिटायझर नियमित वापर करण्याच्या सुचना प्राचार्य मंगेश जाधव यांनी दिली.

या लसीकरण मोहिमेत प्राथमिक आरोग्य केंद्रातील एल.एच.व्ही. कार्ले, लॅब टेक्निशिअन लबडे ए.बी., किरण पाटील, बंडू म्हात्रे, शिंपी व्ही. डी., आरोग्यसेविका राजदेव एस.ए., पिंपरकर व्ही. डी., जाधव एम. बी., आशासेविका आशा पंडीत, कार्ले एम. एस. तसेच विद्यालयातील शिक्षक शिंदे जी.बी., जाधव व्ही. पी., शिक्षिका देशमुख एस.एस., जाधव एस. व्ही.आदी शिक्षकांनी नियोजन केले.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top