निघोज येथील स्वप्नील कचरदास उनवणे यांना पोलिस निरीक्षक पदी पदोन्नती

0

निघोज/प्रतिनिधी:  पारनेर तालुक्यातील निघोज येथील स्वप्नील कचरदास उनवणे यांना पोलिस निरीक्षक पदी पदोन्नती भेटल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

स्वप्नील उनवणे यांची मुंबई येथे पीएसआय म्हणून निवड झाली होती. त्यानंतर उनवणे यांची गोंदिया जिल्ह्यात बदली झाली. त्यानंतर त्यांना एपीआय म्हणून बढती मिळाली होती. त्यानंतर त्यांची जळगाव जिल्ह्यात बदली झाली आणि आत्ता नुकतीच स्वप्नील उनवणे यांना पोलिस निरीक्षक म्हणून पदोन्नती मिळून नाशिक येथे बदली झाली आहे. 

स्वप्नील उनवणे हे अतिशय कर्तबगार पोलिस अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक असून पोलिस खात्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी त्यांच्या कार्यक्षमतेची दखल घेत वेळोवेळी त्यांचा पोलिस खात्याने सन्मान केला आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top