निघोज ग्रामपंचायत माध्यमातून विकासकामांबरोबच ग्रामस्वच्छता अभियान चांगल्या प्रकारे राबविण्यात येत असून घंटागाडीच्या (स्वच्छता दूत) माध्यमातून गाव स्वच्छ तर आरोग्य चांगले राहण्यासाठी मदत होणार आहे. - मंगेश लाळगे (तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष )

0

पारनेर प्रतिनिधी सागर आतकर/महाराष्ट्र दर्शन न्युज: 

निघोज ग्रामपंचायतने सुरू करण्यात आलेल्या घंटागाडी (स्वच्छता दूत) शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष व तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मंगेशशेठ लाळगे, संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष व निघोज आळकुटी गटाचे नेते सचिन वराळ पाटील, सरपंच चित्राताई वराळ पाटील, उपसरपंच माऊली वरखडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

निघोज ग्रामपंचायत माध्यमातून विकासकामांबरोबच ग्रामस्वच्छता अभियान चांगल्या प्रकारे राबविण्यात येत असून घंटागाडीच्या (स्वच्छता दूत) माध्यमातून गाव स्वच्छ तर आरोग्य चांगले राहण्यासाठी मदत होणार आहे. - मंगेश लाळगे (तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष )

निघोज ग्रामपंचायत वतीने ८ लाख रुपये खर्चाच्या घंटागाडी (स्वच्छता दूत) शुभारंभ संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष व निघोज आळकुटी जिल्हा परिषद गटाचे नेते सचिन वराळ पाटील, सरपंच चित्राताई वराळ पाटील, उपसरपंच माऊली वरखडे यांच्या हस्ते मंळगंगा मंदीराच्या प्रांगणात श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी लाळगे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नाना पाटील लंके, बाजार समितीचे माजी उपसभापती बबुशा वरखडे, निघोज सोसायटीचे माजी अध्यक्ष अनंतराव वरखडे, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त शिवाजीराव वराळ, बबनराव ससाणे, ग्रामपंचायत सदस्य मंगेश वराळ, सदस्या रुपालीताई गायखे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान पदाधिकारी सतिष साळवे, अल्पसंख्याक समाजाचे नेते अस्लमभाई इनामदार, दत्ता घोगरे, संदीप पाटील वराळ युवा मंचचे पदाधिकारी निलेश घोडे, स्कूल कमीटीचे अध्यक्ष व जिल्हा भाजपचे सांस्कृतिक विभागाचे उपाध्यक्ष विलासराव हारदे, विष्णू दादा लंके,  ग्रामपंचायत माजी सदस्य भिमराव लामखडे, रवी लंके, रंगनाथ ढवण, ग्रामसेवक दत्तात्रय वाळके, पांडुरंग लामखडे, महादू लंके, प्रगतीशील शेतकरी संतोष शेटे, रामा वराळ, रामजी रासकर, प्रकाश वराळ, आप्पासाहेब वराळ, बाळु काका देशपांडे आदी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वर्षभरात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. ग्रामस्वच्छता अभियान महत्वपूर्ण असून ग्रामपंचायतने नवीन घंटागाडी ( स्वच्छता दूत ) घेऊन चांगले काम केले असून जनतेने स्वच्छतेला महत्व देऊन ग्रामपंचायतला सहकार्य करण्याचे आवाहन लाळगे यांनी केले आहे. सरपंच चित्राताई वराळ पाटील व उपसरपंच माउली वरखडे यांनी गेली वर्षभरात गाव व परिसरात केलेल्या विकासकामांची माहिती दिली.



रामा वराळ यांनी घंटागाडी ट्रॅक्टर या पुर्वी उपलब्ध असताना तो नादुरुस्त झाला. गेली चार महिने संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे सदस्य रामा वराळ यांनी चार महिन्यांसाठी ट्रॅक्टर उपलब्ध करून दिला. यावेळी वराळ यांचा ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या वतीने बाजार समितीचे माजी उपसभापती बबुशा आण्णा वरखडे यांच्या हस्ते सत्कार करुन सन्मानित करण्यात आले.


Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top