मुंबई/महाराष्ट्र दर्शन न्युज
दिल्लीमधे द लीला एबिएंस कॉन्टिनेंटल फाइव स्टार हॉटेलमध्ये नॅशनल ह्यूमन राईट्स ऑर्गनायझेशनच्यावतीने इंडियन आयकॉन अवॉर्ड चे आयोजन केले. या कार्यक्रमामध्ये भारतातून विभिन्न राज्यातून विविध क्षेत्रातून आलेल्या २५० लोकांना आयकॉन अवॉर्ड देऊन सन्मानित केले. या आयकॉन अवॉर्ड चे आयोजक श्री रवीकुमारजी तसेच या अवॉर्ड चे मुख्य अतिथी भारत सरकार पर्यावरण मंत्री श्री मामा नतूंग तसेच देशातील विविध राज्यातून शिक्षा, क्षात्रिय, वैज्ञानिक, आय.ई.एस ऑफिसर उपस्थित होते. या प्रसंगी सुप्रसिद्ध इंडियन क्लासिकल सिंगर, बॉलिवूड प्ले-बॅक सिंगर, अभिनेत्री, सोसिएल ऍक्टिविटिस्ट, म्युझिक डिरेक्टर, लोकनृत्य कोरीओग्राफर आणि संगीत शिक्षिका आशा अनेक कलांनी परिपूर्ण अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या डॉ.छाया साखरे यांना उत्कृष्ट गायिक आणि उत्कृष्ट समाजसेविका याना ‘इंडियन आयकॉन अवॉर्ड’ देऊन सन्मानित केले.
डॉ. छाया साखरे यांना कलाक्षेत्रात, शिक्षाक्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रातुन त्यांचे परिजन, सहकारी मित्र-मैत्रिणीनी खूप-खूप अभिनंदन केले तसेच त्यांच्या संगीत क्षेत्रातील दोन्ही गुरू भारतीय क्षात्रिय गायिका पदमविभूषण डॉ. प्रभा अत्रेजी आणि भजन सम्राट पद्मश्री श्री. अनुप जलोटाजी यांनी छायाजीचे खूप खूप कौतुक आणि अभिनंदन केले आणि भविष्यातील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिल्या. डॉ. छाया साखरे यांना आता पर्यंत अनेक पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांपैकी लिजेंड दादासाहेब फाळके अवॉर्ड, इंडियन स्टार अवॉर्ड, मुंबई महापौर पुरस्कार, अमेझिंग इंडियन पेर्सोनॅलिटी अवॉर्ड, दादासाहेब फाळके टेलिव्हिजन अवॉर्ड, राष्ट्ररत्न अवॉर्ड, गिरनार संगीत रत्न अवॉर्ड गुजरात, झी टाऊन सोसायटी अवॉर्ड आणि एम्पॉंवरिंग विमेन्स ऑफ इंडीया अवॉर्ड, महात्मा गांधी अवॉर्ड तसेच ओ. एम. जी रेकॉर्ड, स्टार रेकॉर्ड बुक इंटरनॅशनल, नेशन प्राईड बुक रेकॉर्डस मध्ये नामांकन मिळाले आहे. आय.आय. यु इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी द्वारे ऑनरररी डॉक्टरेट डिग्री प्राप्त झाली आहे. छाया साखरे यांचं पहिलं पुस्तक “मीरा और मैं” या पुस्तकाचे विमोचन पाहुण्यांच्या उपस्थितीत झालं आहे व पुस्तक लवकरच आपणा सर्वासाठी प्रकाशित होत आहे.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद