कीर्तन सोहळ्याचा दुसरा दिवस: नोकरी करण्यापेक्षा आयुष्यात नोकरी निर्माण करणारे व्हा- ह.भ.प. नवनाथ महाराज माशेरे

0
निघोज: मळगंगा डेअरी फार्म, कन्हैय्या डेअरी निघोज या संस्थेचे पंचविसाव्या वर्षात यशस्वी पदार्पणानिमित्त भव्य कीर्तन महोत्सवाचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. यावर्षी या कीर्तन सोहळ्याला २६/ ३/२०२२ रोजी सुरुवात झाली, पहिल्या दिवशीची कीर्तन सेवा ही धर्मचार्य हरी भक्त परायण शंकर महाराज शेवाळे यांच्या कीर्तन सेवेने झाली. आज कीर्तन सोहळ्याचा दुसरा दिवस आज हरी भक्त परायण नवनाथ महाराज माशेरे यांच्या कीर्तन सेवेने सुरुवात झाली.
कोरोनामुळे गेली २ वर्षात कोरोना नियमांमुळे हा कीर्तन सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा करण्यास बंधने होती. शनिवार पासून कीर्तन सोहळ्याला सुरुवात झाली असून सांगता ही गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रामयनाचार्य रामराव ढोक महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने होईल. या कीर्तन सोहळ्याचा अहमदनगर जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यातील हजारो भाविक लाभ घेत असतात. 
फोटो- जयसिंग हरेल


यावेळी ह.भ.प. नवनाथ महाराज माशेरे यांनी कन्हैय्या परिवाराच्या वतीने तरुणांना व उपस्थितांना एक मोलाचा संदेश दिला की नोकरी करण्यापेक्षा आयुष्यात नोकरी निर्माण करणारे व्हा. म्हणजे उद्योगपती व्हा. आजच्या तरुणांसाठी ही प्रेरणादायी गोष्ट आहे. आयुष्यभर नोकरी करण्यापेक्षा नोकरी निर्माण करणे आज काळाची गरज आहे. 

येणार्‍या पावसाळ्यामध्ये याची त्याची जिरवा जिरवी करण्यापेक्षा पाणी जिरवा आणि वृक्षारोपण करण्याचा निच्छय आपल्या हातामध्ये घ्या जेणे करून पुन्हा कधी कोरोंनाची लाट या महाराष्ट्रात य देशात आली तर ऑक्सीजन पासून मारणार नाहीत याची खबरदारी आजच्या तरुणांना घ्यावी लागेल. हा संदेश सर्वांसाठी महत्वाचा आहे.

या कीर्तन सोहळ्याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मळगंगा मिल्क अँड ऍग्रो प्रोडक्टचे संचालक शांताराममामा लंके, मुंबई कुलाबा येथील उद्योजक बबनभाऊ लंके व कन्हैया उद्योग समूहाचे सीइओ मच्छिन्द्र लंके यांनी केले.
फोटो- जयसिंग हरेल

फोटो- जयसिंग हरेल




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top