आता महिलांनाही 6000 रुपये मिळणार, केंद्र सरकारची मातृ वंदन योजना, लाभ घेण्यासाठी वाचा..

0



भारतात केंद्र सरकारकडून दुर्बल घटक, महिला आणि इतर काही घटकांच्या विकासासाठी अनके वेगवेगळ्या योजना राबवल्या जात असतात. देशभरात शेतकऱ्यांना जसे वर्षाला अनुदान म्हणून प्रत्येकी 6000 रुपये मिळतात. तसेच आता महिलांसाठीही केंद्र सरकारची एक अशी योजना आहे, ज्याद्वारे देशभरातील अनेक महिलांना आथिर्क लाभ मिळू शकतो. ही मदत आर्थिक स्वरूपात असणार आहे. महिलांसाठीच्या या योजनेचं नाव पीएम मातृ वंदन योजना (PMMVY Scheme) असं आहे.

पीएम मातृ वंदन योजनेचे फायदे काय?

भारत हा कृषीप्रधान देश असून अनेक कारणांमुळे देशातील शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते, हे आपल्याला माहीतच आहे. तसे आता काही गरीब महिलांनाही आर्थिक मदत म्हणून केंद्र सरकार 6000 रुपये देणार आहे. याचा फायदा देशातील लाखो महिलांना होणार असून या योजनेचा हवा तेवढा प्रसार न झाल्यामुळे अनेक महिला आताही या लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे केंद्र सरकार पीएम मातृ वंदन योजना ही योजना अनेक उपक्रमांतर्गत महिलांपर्यंत पोहोचवत असते. ही योजना केवळ महिलांसाठी राबवली आहे. या योजनेच्या माध्यमातून भारतातील महिलांना 6000 रुपये मिळतात. आता तुम्ही म्हणत असाल की, आम्ही या योजनेचा फायदा कसा घेऊ, तर माहितीनुसार गर्भवती असलेल्या तसेच स्तनपान करणाऱ्या महिलांना आर्थिक मदत म्हणून 1 जानेवारी 2017 साली ही योजना सुरु झाली आहे. या योजनेस प्रधानमंत्री गर्भावस्था सहाय्यता योजना या नावानेही ओळखले जाते आणि या योजनेसाठी गर्भवती महिला अर्ज करु शकतात.

कागदपत्रे काय लागतील?

मुलाच्या जन्माचे प्रमाणपत्र
बँक खात्याचे पासबुक
आई-वडिलांचे आधार कार्ड
आई-वडिलांचे ओळखपत्र

पीएम मातृ वंदन योजनेचा (PMMVY Scheme) लाभ घेण्यासाठी तुम्ही केंद्र सरकारच्या पुढील वेबसाईटवर जाऊन अधिक माहिती घेऊ शकता https://wcd.nic.in/schemes/pradhan-mantri-matru-vandana-yojana

पैसे कसे मिळणार?

या योजनेच्या माध्यमाद्यांतून फायदा तर मिळणार पण तो फायदा नेमका कसा मिळणार हे आपल्याला समजणे महत्वाचे असते. समजून घ्या कि, या योजनेचा उद्देश हा आपल्या देशातील आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या आई आणि मुल या दोघांची काळजी घेणे हा आहे. कारण देशात कुपोषित बालकांची संख्याही जास्त आहे त्याला आळा बसण्यास या मार्फत प्रयत्न होईल. मुलांच्या पालनपोषणास अधिक मदत होईल. या योजनेत केंद्र सरकारकडून सांगितल्याप्रमाणे 6000 रुपयांची आर्थिक मदत तीन टप्प्यात दिली जाते. साधारणतः पहिल्या टप्प्यामध्ये 1000 रुपये तर दुसऱ्या टप्प्यात 2000 रुपये, तिसऱ्या टप्प्यात 2000 रुपये देण्यात येतात. याशिवाय उर्वरित रक्कम 1000 रुपये ही मुलाचा जन्म झाल्यावर देण्यात येते. म्हणून तुम्हाला याविषयी कल्पना असणं गरजेचं आहे.

Source

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top