🔯 22/3/2022 :आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

0


 

मेष (Aries): तुमच्या व्यक्तिमत्वाचा दबदबा राहील. मनात नवीन आकांक्षा रूजतील. गैरसमजाला खतपाणी घालू नका. कामातून समाधान शोधावे. राजकारणात एखादा मोठा हेतू साध्य होईल. व्यवसायात कोणालाही उधार देऊ नका. वादविवाद टाळण्याचा प्रयत्न करा. धन आगमन होण्याची शक्यता. एखादे थांबलेले कार्य पूर्ण होईल. मुलांसोबत हसत खेळत दिवस घालवाल.

वृषभ (Taurus): व्यसनाच्या आहारी जाऊ नका. प्रवासात सतर्कता बाळगावी. गोष्टींचे गांभीर्य लक्षात घेऊन वागावे. तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप पडेल. एखाद्या जुन्या मित्राची मदत होईल. विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशाने ते खुश होतील. राजकारणाशी संबंधित व्यक्तींना लाभ होतील. दाम्पत्य जीवनात आनंद राहील. स्थावर संपत्ती, संबंधित व्यक्तींपासून सावध राहा. अचानक धन खर्च करावे लागेल.

मिथुन (Gemini) : जुनी येणी वसूल होतील. घरातील स्वच्छता आवडीने कराल. वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल. विद्यार्थी तसेच स्पर्धा परीक्षेस बसणाऱ्यांसाठी दिवस चांगला आहे. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे होतील. आयटी तसेच मीडिया क्षेत्रातील व्यक्तींना कामात यश मिळेल. वैवाहिक जीवनात आनंद राहील. आरोग्याच्या तक्रारी संभवू शकतात. कामात खंड पडू देऊ नका.

कर्क (Cancer) : कलेसाठी लागणारे साहित्य खरेदी कराल. व्यापार्‍यांना चांगला आर्थिक लाभ होईल. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल. करमणुकीचे कार्यक्रम पहाल. विद्यार्थ्यांना निर्णय घेण्यात अडचणी येतील. काळजीपूर्वक वाहन चालवा. नोकरीच्या ठिकाणी खूप काम असेल. वादापासून दूर राहणे चांगले. वैवाहिक जीवन चांगलं असेल. घरगुती कार्यक्रम काढले जातील. सर्वांशी खिलाडू वृत्तीने वागाल.

सिंह (Leo) : पराक्रमाला चांगला वाव मिळेल. हातातील कामे आधी पूर्णत्वास न्यावीत. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत. कलात्मक दृष्टीकोन ठेवाल. आत्मिक समाधान शोधावे. नोकरी बदलण्याच्या दिशेने पाऊल उचलाल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. पाहुण्यांचं आगमन होईल. जोडीदाराचे तुम्हाला कामात सहकार्य लाभेल. आज तणाव निर्माण होऊ शकतो. स्पष्ट, पण खरे बोलाल.

कन्या (Virgo) : कौटुंबिक जबाबदारी वाढू शकते. हस्तकलेसाठी वेळ काढावा. नियमांचे उल्लंघन करू नका. कोर्ट-कचेरीच्या कामात त्रास संभवतो. डोळ्यांची वेळेवर काळजी घ्यावी. राजकारणी लोकांसाठी दिवस त्रासाचा आहे. बिझनेस येण्याची शक्यता आहे. आयटी, मार्केटिंग तसेच सिनेामाशी संबंधित व्यक्ती यशस्वी ठरतील. कुटुंबातील व्यक्तींशी वादावादी होऊ शकते.

तुळ (Libra) : अधिकारी लोकांची गाठ पडेल. ओळखीचा फायदा करून घेता येईल. गप्पिष्ट लोकांचा सहवास लाभेल. नवीन मित्र जोडता येतील. व्यावसायिक लाभाकडे लक्ष ठेवा. आयटी, मीडिया आणि बँकिंग क्षेत्रात नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी दिवस चांगला असेल. विद्यार्थ्यांना नव्या संधी उपलब्ध होतील. श्वसनाचे विकार सुरू होऊ शकतात. धन आगमन होईल. आरोग्याची काळजी घ्या.

वृश्‍चिक (Scorpio) : मनातील अनामिक भीती काढून टाकावी. कामाची घडी नीट बसवावी. कौटुंबिक सौख्य उत्तम लाभेल. काही खर्च आकस्मिक होऊ शकतात. बँकिंग क्षेत्रातील व्यक्तींचा दिवस बीझी असेल. लेखन तसेच सिने जगताशी संबंधित व्यक्तींसाठी दिवस भाग्यकारक आहे. पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. दाम्पत्य जीवन सुखमय असेल. आरोग्य चांगले राहील. आज उत्साहाचा अभाव राहील.

धनु (Sagittarius) :आवडीनुसार कपडेलत्ते खरेदी कराल. जवळच्या सहलीचे आयोजन कराल. प्रेमाची दृष्टीने चांगली मैत्री लाभेल. प्रत्येक गोष्टींचा उत्तम रीतीने लाभ घ्याल. आकर्षणाला बळी पडू नका. विद्यार्थी आपल्या प्रगतीने समाधानी राहतील. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. नोकरीच्या नव्या संधी उपलब्ध होतील.कुटुंबातील आनंददायी वातावरण पण आपल्या मनाला प्रफुल्लित ठेवण्यात मदत करेल.

मकर (Capricorn) : घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील. शांत व संयमी विचार कराल. कौटुंबिक जबाबदारी लक्षात घ्यावी. भावंडांची काळजी लागून राहील. धार्मिकतेत चांगली वाढ होईल.रखडलेली सर्व कामे पूर्ण होतील. अनेक संधी चालून येत राहतील. नोकरीच्या ठिकाणी तुमची प्रगती होईल. वैवाहिक जीवनात सुख मिळेल. आयटी तसेच मीडिया क्षेत्रातील व्यक्ती यशस्वी ठरतील.घरात सुखदायक प्रसंग घडतील.

कुंभ (Aquarious) : गोष्टी मनाजोग्या जुळवून आणाल. कौटुंबिक सौख्याला प्राधान्य द्यावे. कर्तव्यात कसूर करून चालणार नाही. मोकळ्या वातावरणात रमून जाल. चटपटीत पदार्थ खाल. मुलांकडून एखादी शुभवार्ता मिळेल. व्यवसायात मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. लव्ह लाईफमध्ये तुम्ही पार्टनरला वेळ द्याल. दाम्पत्य जीवनात आनंदीआनंद असेल. आरोग्याकडे दुर्लक्ष नको. वाढत्या कामामुळे थकवा जाणवेल.

मीन (Pisces) : प्रवासाचा आनंद घ्याल. मित्र-मैत्रिणींचा गोतावळा जमवाल. अचानक पैसा येईल. कमी श्रमात कामे करण्यावर भर द्याल. भागिदारीतून चांगला लाभ होईल. शिक्षण तसेच मीडियाशी संबंधित लोकांना लाभ होतील. व्यवसायात विचारपूर्वक निर्णय घ्या. लव्ह लाईफमध्ये समस्या सतावणार नाहीत. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. शारीरिक स्वास्थ्य वाढेल.

source

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top