जाणून घ्या त्या बिझनेसबद्दल सविस्तर..
आज आम्ही सांगणार आहोत अशा बिझनेसबद्दल (Buisness Idea) ज्याला करण्यासाठी तुमच्या हातामध्ये उच्च शिक्षणाचं सर्टिफिकेट असणं गरजेचं नाही. जेमतेम शिक्षण असलं म्हणजे तुम्हाला हिशेब जमेल आणि मार्केटचा अभ्यास करून थोडंसं ज्ञान घेऊन आपला बिझनेस कसा वाढवायचा याचं कौशल्य लागेल. कारण तुम्हाला कार वॉशिंग व्यवसायाबद्दल आम्ही सांगत आहोत. यामध्ये थोड्या गुंतवणुकीत तुम्ही जास्त फायदा कमावू शकता. हा एक चांगला व्यवसाय असल्याचे सिद्ध होऊ शकते. चांगली गोष्ट अशी आहे की जर तुमचे काम चांगले झाले तर तुम्ही कार मेकॅनिकची नियुक्ती करून तुमच्या व्यवसायात नवीन युनिट जोडू शकता.
कार धुणे म्हणजे कार धुण्यासाठी (Car Washing) व्यावसायिक मशीनची आवश्यकता असते. बाजारात काही प्रकारची यंत्रे आहेत. त्यांची किंमत 12,000 ते 1 लाख रुपयांपर्यंत आहे. सुरुवातीला तुम्ही छोटा व्यवसाय सुरु करून तो नंतर वाढवत न्या. सुरुवातीला तुम्ही कमी खर्चात मशीन खरेदी करू शकता. अंदाजे 14,000 रुपयांची मशीन खरेदी केली तर यामध्ये तुम्हाला 2 हॉर्स पॉवर असलेले मशीन मिळू शकते. या 14,000 रुपयांमध्ये तुम्हाला सर्व पाईप्स आणि नोझल मिळतील. तसेच तुम्हाला 30 लिटरचा व्हॅक्यूम क्लिनर घ्यावा लागेल जो 9,000-10,000 रुपयांना मिळू शकतो.
आता तुम्हाला लागेल ते धुण्याचे सामान ज्यामध्ये शॅम्पू, हातमोजे, टायर पॉलिश आणि डॅशबोर्ड पॉलिश पाच लिटर घेता येईल. असं मिळून सुमारे 1700 रुपये होतील. कार धुण्याचे तुम्ही वेगवेगळ्या गाड्यांनुसार, शहरानुसार वेगवेगळे पैसे घेऊ शकता. साधारणपणे लहान शहरांमध्ये याची किंमत रु.150-450 पर्यंत असते. त्याच वेळी, त्याची किंमत मोठ्या शहरांमध्ये 250 रुपयांपर्यंत पोहोचू शकते. दुसरीकडे, स्विफ्ट डिझायर, ह्युंदाई वेर्ना यांसारख्या कारसाठी 350 रुपयांपर्यंत आणि एसयूव्हीसाठी 450 रुपयांपर्यंत शुल्क आकारू शकता.
जर तुम्हाला दिवसाला 7-8 गाड्या जरी वॉश करता आल्या आणि प्रति कार सरासरी 250 रुपये कमावले तर दररोज 2000 रुपयांपर्यंत कमाई शक्य आहे. यासोबत तुम्हाला रोज दुचाकीही मिळू शकतात. दरमहा 50-60 हजार रुपये पासून कमावू शकता किंवा जास्त गाड्या असल्या आणिकमला एक दोन मुलं ठेवली तर त्याहून अधिक पैसे तुम्ही कमी वेळेत सहज कमावू शकता आणि एखाद्या लाखाची कमाईही करू शकता.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद