ज्ञानाला भक्तीचा आणि प्रेमाचं ओलावा असेल तर ज्ञानाला लीनता आल्याशिवाय राहत नाही. - वाणीभूषण हरी भक्त परायण ज्ञानेश्वर महाराज तांबे

0


महाराष्ट्र दर्शन न्यूज | निघोज | प्रतिनिधी - सागर आतकर

घरामध्ये फक्त ज्ञान असेल तर त्या ज्ञानाला अहंकार आल्याशिवाय राहत नाही आणि ज्या ज्ञानाला भक्तीचा आणि प्रेमाचं ओलावा असेल तर ज्ञानाला लीनता आल्याशिवाय राहत नाही. त्या घरामद्धे विचारणाची श्रीमंती वाढली जाते. त्या घरामध्ये शून्यातून विश्व निर्माण करणारे पोरं जन्माला येतात. ज्या घराला परमार्थ समजला त्या घरातला अनर्थ पळाला. ज्या घरातला अनर्थ पळाला त्या घरामध्ये भक्ति आणि प्रेमाचं ओलावा प्राप्त झाला. ज्या घराला भक्तीप्रेम समजलं त्या घराला तन सूचीर्भूत झालज्या घरातलं तन सूचीर्भूत झाल त्या घरातलं मन ठीक झाले ज्या घरातलं तन मन ठीक झाल्यावर त्या घराला धन प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. 
मळगंगा डेअरी (कन्हैय्या डेअरी ) चा पंचविसाव्या वर्षात पदार्पनानिमित्त कीर्तन सोहळ्याच्या निमित्ताने सातव्या दिवशी वाणीभूषण हरी भक्त परायण ज्ञानेश्वर महाराज तांबे यांची कीर्तन सेवा झाली. यावेळी ते बोलत होते. 

फोटो - जयसिंग हरेल


पारनेर तालुक्यातील निघोज येथील मळगंगा मिल्क अँड ऍग्रो प्रॉडक्ट्स प्रा.लि (कैन्हया दुध) या संस्थेच्या पंचविसाव्या वर्षात यशस्वी पदार्पणा निमित्ताने आयोजित भव्य कीर्तन महोत्सव २०२२ चा शनिवार रोजी दिनांक  २६/३/२०२२ रोजी प्रारंभ झाला. हा सोहळा गेली सात दिवस मोठ्या आनंदात उत्साहात साजरा झाला. रोज संध्याकाळी सात ते नऊ पर्यंत नामवंत कीर्तनकार यांची कीर्तन सेवा झाली. रोज कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचा आस्वाद श्रोत्यांनी घेतला. उद्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या कीर्तन सोहळ्याचा शेवट रामयनाचार्य रामरावजी ढोक महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने होणार आहे.

कन्हैय्या उद्योग समूह हा अहमदनगर जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध डेअरी प्लांट आईस्क्रीम, श्रीखंड, फ्लेवर्ड दूध, लोणी आणि तूप बनवणारा प्रतिदिन दूध उत्पादन करणारी कन्हैया डेअरी


या कार्यक्रम प्रसंगी राजकीय, सामाजिक, उद्योग समूहातील अनेक मान्यवर मोठ्या संखेने उपस्थित होते.

या कीर्तन सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी कन्हैय्या उद्योग समूहाचे सर्व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ वरखडे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top