गुगल पे ने (Google Pay) डिजिटल पेमेंट आणि ऑनलाइन ट्रान्झॅक्शनची युजर्समध्ये क्रेझ पाहता ग्राहकांसाठी पेमेंट सर्विस अधिक सोपी करण्यासाठी एक नवी सुविधा लाँच करण्याची घोषणा केली आहे. या सुविधेद्वारे तुम्ही कधीही आणि कुठेही अगदी चुटकीसरशी पैसे ट्रान्सफर करू शकता.
सविस्तर माहीती वाचा…
गुगल पे या यूपीआय ॲपने पाइन लॅब्ससह (Pine Labs) भागीदारी करत टॅप टू पे (Tap to Pay) सर्विसची घोषणा केली आहे. आतापर्यंत टॅप टू पे सर्विस केवळ कार्डसाठी उपलब्ध होती. आत्तापर्यंत टॅप टू पे फीचर फक्त डेबिट आणि क्रेडीट कार्डसाठी उपलब्ध होते. आता ते यूपीआय पेमेंटसाठी देखील मिळणार आहे.
गूगल पे च्या या टॅप सर्विसमुळे पेमेंट करणं अधिक सोपं होईल. Google Pay आणि Google PAC चे बिजनेस हेड साजिथ शिवानंदन यांनी सांगितलं की, Google Pay च्या या सर्विसचा वापर कोणताही यूपीआय यूजर (UPI Users) करू शकतो. भारतातील सर्व पाइन लॅब्स अँड्रॉइड POS टर्मिनलचा वापर करुन ट्रान्झेक्शन करण्यासाठी आपल्या NFC स्मार्टफोनचा वापर करू शकणार आहे.
टॅप टू पे फिचर फक्त यूपीआय युजर्ससाठी उपलब्ध असेल, जे पाइन लॅब्स अँड्रॉइड POS टर्मिनलवर देशभरात कुठेही त्यांच्या NFC-सक्षम अँड्रॉइड स्मार्टफोनचा वापर करून पेमेंट करू शकणार आहेत.
टॅप टू पे फीचर कसं काम करेल..?
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद