मेष (Aries): मानसिक चांचल्य जाणवेल. उगाच नसती काळजी करत बसू नका. वाताचे त्रास होऊ शकतात. अनाठायी चिडचिड वाढू शकते. फार हट्टीपणा करू नका. दिवस शुभ आहे. परंतु मनात काही विचार सतावत राहतील. कामा-धंद्यात वाढ होईल. नोकरीत पदोन्नती होईल. बाहेर फिरायला जाऊ शकता. मित्रपरिवारांच्या भेटीमुळे मन आनंदीत राहील.
वृषभ (Taurus): चंचलतेवर मात करावी. स्त्रियांच्या सानिध्यात वावराल. मनातील इच्छा पूर्ण होतील. कामात घाई करून चालणार नाही. तुमचे व्यक्तिमत्व खुलून येईल. दिवस तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. धनलाभाची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. सामाजिक कार्यात आणि मित्रांसोबत घालवाल.
मिथुन (Gemini) : शांत व गंभीर विचार मांडाल. कामे खिळून पडल्यासारखी वाटतील. सामुदायिक गोष्टीत लक्ष घालू नका. वादाचा मुद्दा टाळावा. संसर्गजन्य विकार जडू शकतात. प्रवासाच्या योजना बनतील. वैवाहिक जीवनात आनंद कायम राहील. आयटी आणि बॅकिंग क्षेत्रातील लोकांना यशप्राप्ती मिळेल. प्रेम-प्रसंगात वातावरण अनुकूल असेल. आरोग्याच्या समस्या कायम राहतील.
कर्क (Cancer) : अतिविचार करणे टाळावे लागेल. बौद्धिक थकवा जाणवेल. उगाचच नसत्या गोष्टीत लक्ष घालू नका. कौटुंबिक प्रश्न जाणून घ्यावेत. एकाचवेळी अनेक कामे अंगावर घ्याल.मनात स्थिरता ठेवावी लागेल. धनप्राप्ती होईल, पण बाहेरील प्रवासामुळे आपला आर्थिक खर्च होऊ शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. सकारात्मक गोष्टींमुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल.
सिंह (Leo) : सतत खटपट करत राहाल. मनात प्रबळ इच्छा जागृत होईल. मुलांच्या कारवायांवर लक्ष ठेवा. सर्वांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा. सांपत्तिक दर्जा टिकवून ठेवावा लागेल. पैशांचा लाभ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. नवीन गोष्टी शिकण्याची संधी प्राप्त होईल. रखडलेल्या कामांना गती मिळेल. वैवाहिक जीवनातील प्रेमपूर्ण वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे.
कन्या (Virgo) : कामातील बदलांकडे सकारात्मकतेने पहावे. वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. तडफदारपणे वागणे ठेवाल. कामे जलद गतीने उरकाल. महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल. आपण नकारात्मक विचारांपासून दूर रहा. वायफळ खर्च करणं टाळा. आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबातील व्यक्तींशी बोलताना किंवा व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. मित्रांसाठी खर्च कराल. वडीलधार्यांकडून लाभ होईल.
तुळ (Libra) : मनाची दोलायमान अवस्था जाणवेल. तुमच्यातील ठामपणा दाखवून द्यावा. इतरांवर तुमचा प्रभाव पडेल. अधिकारी व्यक्तींची गाठ पडेल. मैत्रीचे नवीन संबंध जोडले जातील. आर्थिक व्यवहार करताना पैशांच्या बाबतीत विशेष लक्ष ठेवणं गरजेचे आहे. आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. समाजातील व्यक्तींशी वाद होणार नाहीत याची काळजी घ्या.
वृश्चिक (Scorpio) : पत्नीच्या प्रेमळ स्वभावाचा प्रत्यय येईल. मुलांशी लहान-सहान गोष्टीवरून कुरबुर होऊ शकते. खर्चाचे भान ठेवावे लागेल. नसते साहस करतांना सारासार विचार करावा. दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. दाम्पत्यांमध्ये सुख-शांतीचे वातावरण राहील. धनलाभ होईल. नकारात्मक विचारांपासून दूर रहा. नोकरीत पदोन्नतीची आनंदी वार्ता मिळेल. वरिष्ठ अधिकार्यांचे सहकार्य लाभेल.
धनु (Sagittarius) : गोष्टींची आवश्यकता लक्षात घेऊन खर्च करावा. वादावादीत सहभाग नोंदवू नका. मागचा-पुढचा नीट विचार करावा. उतावीळपणे वागू नका. आपली आर्थिक कुवत लक्षात घ्यावी.आर्थिक व्यवहार करताना सावधान रहा. तुमची आई तुमच्यावर खूश होईल. भेटवस्तूवर खर्च होण्याची शक्यता आहे. दिवस तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत वेळ घालवण्यासाठी चांगला आहे.
मकर (Capricorn) : कौटुंबिक गैरसमज टाळावेत. तुमच्या मनातील आशा पल्लवित होतील. मित्रांची मदत घ्यावी लागेल. काही कामात अनाठायी अडकून पडाल. उगाच चिडचिड करू नका. मनातली शंका दूर होईल. कोणत्याही नवीन कार्याची सुरूवात करू शकता. इतरांशी व्यवहार करताना मतभेद होणार नाहीत, याची काळजी घ्या. आर्थिक लाभ होईल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष केंद्रीत होईल.
कुंभ (Aquarious) : व्यावसायिक लाभावर लक्ष केंद्रित करावे. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. मनाची विशालता दाखवाल. अंगीभूत कलेला चांगला वाव मिळेल. दिवस चांगला असेल. व्यवसायात यशस्वी व्हाल. सिनेमा आणि प्रसारमाध्यमांच्या लोकांसाठी दिवस हा यशाचा असेल. पैशांचं आगमन निश्चित आहे. सरकारी निकाल आपल्या बाजूने लागून लाभ होईल.
मीन (Pisces) : तुमचा कामातील जोम वाढेल. आपले उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करावा. आपलेच म्हणणे खरे कराल. विचारांना वेगळी दिशा देऊन पहावी. चटकन रागवू नका. नोकरी आणि व्यवसायात स्पर्धात्मक वातावरण राहील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. मनात स्थिरता ठेवा. भाऊ-बहिणींकडून चांगला आशीर्वाद मिळेल. बौद्धिक कामे तथा चर्चा यांत भाग घेणे तुम्हाला आवडेल.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद