‘टाटा’ करणार असं काही, की ‘अमेझाॅन’-‘प्लिपकार्ट’ला बसणार हादरा.. हवं ते एका जागी मिळणार..!

0



‘आयपीएल’ सुरु झाल्यापासून टिव्हीवर एक जाहिरात सातत्याने लक्ष वेधतेय. ‘टाटा निऊ’ असं नाव या जाहिरातीत पाहायला, ऐकायला मिळतं.. शिवाय ‘आयपीएल’ सामन्यादरम्यान मैदानात ‘टाटा निऊ’ या नावाने ‘स्पेशल बाॅक्स’ बनविण्यात आला आहे. खास लकी प्रेक्षकांना त्यात बसण्याची संधी मिळते.

‘टाटा निऊ’ हे नाव वारंवार समोर येत असलं, तरी जाहिरातीतून त्याबाबत स्पष्ट माहिती दिली जात नाही. त्यामुळे या नावाभोवती एक गुढ निर्माण झालंय.. प्रेक्षकांची उत्सुकता मोठ्या प्रमाणात ताणली गेलीय.. अखेर या नावावरील पडदा नि त्यामागील रहस्य दूर झालंय.. नेमका हा काय प्रकार आहे, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या.

प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांची ‘टाटा’ कंपनी पुढील तीन दिवसांत मोठा धमाका करणार आहे.. त्याला कारणही तसंच आहे.. पुढील तीन दिवसांत टाटा कंपनीचं नवं सुपर ‘अ‍ॅप’ येत आहे. रिटेल क्षेत्रात हे सुपर ‘अ‍ॅप’ लवकरच धुमाकूळ घालणार असल्याचा दावा ‘टाटा’कडून करण्यात येत आहे. या सुपर ‘अ‍ॅप’चं नाव आहे, ‘टाटा निऊ.

येत्या 7 एप्रिल रोजी ‘टाटा निऊ’ हे अ‍ॅप लाँच केलं जाणार आहे. सध्या ‘गुगुल प्ले स्टोअर’वर या अ‍ॅपचे ‘पेज लाईव्ह’ झालं आहे. सध्या ‘टाटा’च्या कर्मचाऱ्यांपुरतेच मर्यादित हे अ‍ॅप वापरलं जात होतं.. मात्र, आता लवकरच सर्वांसाठी हे अ‍ॅप लाॅंच केलं जाणार आहे. त्याद्वारे नागरिकांना एक-दोन नव्हे, तर अनेक सेवा एका क्लिकवर मिळणार आहेत.

कोणत्या सेवा मिळणार..?

‘टाटा निऊ’ (TATA Neu) हे ‘सुपर अ‍ॅप’ असून, ‘टाटा’च्या डिजिटलमधील सगळ्या सेवा एकाच प्लॅटफॉर्मवर मिळणार आहेत. त्यात पुढील सेवांचा समावेश असेल..

  • डिजिटल कंटेंट, पेमेंट सुविधा, फायनान्स मॅनेजमेंट, प्रवास आणि हॉटेलिंगची सेवा दिली जाणार आहे.
  • टाटा समूहाच्या विविध डिजिटल सेवा मिळतील. त्याच्या मदतीने, तुम्ही एअर एशिया इंडिया, एअर इंडिया किंवा ताज ग्रुपच्या हॉटेल्समध्ये रुम व फ्लाइटची तिकीटे बुक करू शकता.
  • किराणा सामानासाठी बिग बास्केट, औषधासाठी 1mg, इलेक्ट्रिक वस्तूंसाठी ‘क्रोमा’ आणि इतर ‘टाटा’ वेबसाइटवर प्रवेश मिळेल.
  • या अ‍ॅपवरुन तुम्ही सेवा घेतल्यास तुम्हाला ‘निऊ कॉइन्स’ मिळतील, जे तुम्ही रिडीम करू शकता.
  • शिवाय ‘टाटा निऊ’वर पेमेंट, मनी ट्रान्सफर आणि इतर आर्थिक व्यवहारांसाठी ‘टाटा पे युपीआय’ (Tata Pay UPI) चाही पर्याय मिळणार आहे.

अ‍ॅमेझाॅन, फ्लिपकार्टचं धाबं दणाणलं..

दरम्यान, सध्या भारतात आधीपासूनच असे अनेक ‘सुपर अ‍ॅप्स’ अस्तित्वात आहेत. त्यात अ‍ॅमेझाॅन (Amazon), पेटीएम (Paytm), रिलायन्स जिओ (Reliance Jio) कंपन्यांनी त्यांची ‘सुपर अ‍ॅप्स’ बाजारात आणली आहेत. मात्र, आता ‘टाटा’च्या रुपाने या सगळ्या कंपन्यांसाठी तगडा प्रतिस्पर्धी मैदानात उतरणार आहे. त्यामुळे या कंपन्यांचे धाबे आतापासून दणाणले आहे.. ग्राहक राजा कोणाला पसंती देतो, हे येणाऱ्या काळात समोर येईलच..!


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top