भारतात पहिला टेलिफोन अन् जगात पहिला मोबाईल कधी अवतरला, हे तर माहीतच हवं!

0



मागील काही दशकांत आपल्याला टेलिफोन हा फक्त आपल्या परिसरातील मोजक्या घरांमध्येच दिसायचा. ज्यांच्याकडे टीव्ही, लँडलाईन फोन तो माणूस ते कुटुंब श्रीमंत समजलं जायचं. दिवसांमागुन दिवस बदलले आणि जसजसं पुढे आपण वाटचाल करत राहिलो तसं नवीन शोध लागत गेले, तंत्रज्ञान बदललं आणि माणसाच्या दैनंदिन जीवनात मोठा असा बदल घडून आला. आज सध्या आपण जे काही तंत्रज्ञान वापरतो, गॅझेट्स वापरतो ते बाजारात आले कि आपण खरेदी करून वापरतो.

मागील काही वर्षांमध्ये हजारो मोबाईल्स मोयाबिल कंपन्यांनी बाजारात दाखल केले आणि त्याही आधी टेलिफोन होते. दूरसंचार क्षेत्रांच्या यादीत भारत दुसऱ्या स्थानी आहे. तर पहिल्या स्थानी चीन आहे. आपण टेलिफोन, मोबाईल वापरतो पण काय तुम्हाला माहिती आहे का की याचा शोध कोणी लावला आणि कधी लावला. संपूर्ण जगातील भारतातील फोन ग्राहकांच्या संख्येने फेब्रुवारीत 1.18 अब्जचा आकडा पार केला.

पहिला टेलिफोन आणि मोबाईल…

इंग्लंडच्या ओरिएंटल टेलिफोन कंपनीस सन 1881मध्ये भारत सरकारने कोलकाता, मुंबई व मद्रास या ठिकाणी टेलिफोन सेवा सुरू करण्याची संमती दिली. त्यानुसार 28 जानेवारी 1882 पासून भारतात मुंबई व इतर तीन ठिकाणी टेलिफोन एक्सेंज सुरू झाले. तसं पाहिलं तर जागतिक दूरसंचार क्षेत्राने दिलेली ही सर्वात मौल्यवान गोष्ट. मोबाईलच्या आधी सर्वत्र टेलिफोन अर्थात लँडलाइन फोन होते, हे आपल्याला ज्ञातच आहे.

आजकाल अनेक मोबाईल कंपन्या मोबाईल बनवत आहेत. पण अमेरिकेची एक मोठी मोटोरोला कंपनीने आपला पहिला मोबाईल फोन बाजारात आणला. हा फोन इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर जॉन एफ मिशेल व मार्टिन कूपर यांनी 1973 साली बनवला. त्यानंतर दहा वर्षांनंतर सन 1983 साली मोटोरोलाचा द डायनाटॅक 8000X हा पहिला मोबाईल फोन बाजारात अवतरला. प्राप्त माहितीनुसार आता हाच मोबाईल फोन मोबाईल जगातील पहिला मोबाईल असल्याचं म्हटलं जातंय.

स्मार्टफोन कंपन्या आणि स्पर्धा..

सन 1983 नंतर मोबाईल जगतात दिवसेंदिवस आमूलाग्र बदल घडून आले. पूर्वी श्रीमंतांकडे आढळणारे मोबाईल फोन आता ग्रामीण भागातील गरीब लोकांच्या हाती पोहोचलेत. हे चांगले बदल होऊन फायदा झाला आहे. सध्या अनेक कंपन्या आता मोबाईल निर्मितीच्या व्यवसायात उतरल्या आहेत. स्वस्त दरात उपलब्ध होणारे हँडसेट, कंपन्यांमधील चुरस आणि दूरसंचार सेवेचा स्वस्त दर या तीन प्रमुख कारणांमुळे भारतातील मोबाइलधारकांची संख्या फेब्रुवारीत 1.18 अब्जच्या वर गेली आहे. जगाबाबत सांगायचं झालं तर एका तासामध्ये दोन कोटींहून अधिक स्मार्टफोन विकले जातात. 2013 मध्ये 20 कोटी लोक इंटरनेट वापरत असत आता तीच संख्या 50 कोटींवर गेली आहे.


Source

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top