उद्धव ठाकरेंचा योग्य तो मान राखला गेला पाहिजे - दीपक केसरकर

0



महाराष्ट्र दर्शन न्यूज / मुंबई 

नवं सरकार स्थापन होताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा योग्य तो मान राखला गेला पाहिजे, अशी अपेक्षा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी व्यक्त केली आहे.

उद्धव ठाकरे यांचा अवमान होईल, अशी कोणतीही वाक्य येता कामा नयेत. अशी सूचना भाजप नेत्यांनी आपल्या इतर नेत्यांना द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करत दीपक केसरकर यांनी भाजपला इशारा दिला आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. त्यानंतर आता राज्यात शिंदे गट आणि भाजपचे सरकार येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपने सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. आज शिंदे गटाशी बोलणी झाल्यानंतर राज्यात पुढील सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. त्याआधी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी भाजपला थेट इशारा दिला आहे. 


शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कोणीही अयोग्य शब्द काढता कामा नये, तसेच त्यांचा योग्य तो मान राखला पाहिजे. अशी सूचना भाजप नेत्यांनी आपल्या इतर नेत्यांना द्यावी - दीपक केसरकर 


काल म्हणजेच 29 जून हा दिवस महाराष्ट्रात चालू असलेल्या राजकीय संघर्षादरम्यान अतिशय महत्त्वाचा ठरला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्याचवेळी त्यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज बंडखोर आमदार मुंबईला जाणार येणार आहेत. दरम्यान, महाराष्ट्राच्या विधानसभेच्या इमारतीभोवती सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहून बहुमत सिद्ध करण्याची विनंती केली होती, मात्र फ्लोअर टेस्टपूर्वीच उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव सरकारला 30 जून रोजी बहुमत सिद्ध करण्यास सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top