महाराष्ट्र दर्शन न्युज / निघोज / सागर आतकर /
पारनेर तालुक्यातील निघोज येथील ह.भ.प. मारुती भगवंता बोदगे यांनी नातवाच्या वाढदिवसानिमित्ताने तनपुरेवाडी येथील आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ५५ गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. याप्रसंगी ह.भ.प. निवृत्ती महाराज तनपुरे, डॉक्टर निवृत्ती पानमंद, निघोज नागरी संस्था परिवाराचे अध्यक्ष वसंत कवाद सर, आदर्श मा. सरपंच ठकाराम लंके, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सुनील वराळ, पत्रकार भास्कर कवाद, शाळा कमिटी अध्यक्ष संपत लाळगे, ग्रामपंचायत सदस्या सुधामतीताई कवाद, ग्रामपंचायत सदस्य गणेश कवाद, दिगंबर लाळगे, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक दत्तात्रय लंके, असीम हवालदार, शांताराम लाळगे, मळगंगा ट्रस्टचे विश्वस्त विश्वास शेटे, बबन तनपुरे, माजी ग्रामपंचायत सदस्य दिलीप लाळगे, रोहिदास लामखडे, सामाजिक कार्यकर्ते अशोक लाळगे, नवनाथ लाळगे, शिवाशेठ मंदिरकर, रेवन पानमंद, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दिवसे सर, भुकन मॅडम, मोरे मॅडम, धामणे मॅडम, बेलोटे मॅडम यांचे कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले यावेळी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन मार्गदर्शक आदरणीय वसंत कवाद सर यांनी या सामाजिक उपक्रमाचे गोड शब्दात कौतुक केले व आदरणीय मुख्याध्यापक दिवसे सर यांनी आदर्श उद्योजक व ह.भ.प. मारुती बोदगे यांचा सन्मान केला व सर्वांचे आभार मानले.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद