कोरठण खंडोबा येथे रंगदास स्वामी पायी दिंडीचे उत्साहात स्वागत

0

महाराष्ट्र दर्शन न्यूज / श्री क्षेत्र कोरठण / निलेश जाधव

पंढरपूर आषाढी यात्रेच्या निमित्ताने श्रीक्षेत्र आणे (ता.जुन्नर) ते पंढरपूर आणि क्षेत्र शिंदेवाडी ते पंढरपूर या दोन पायी दिंड्यांचे श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान येथे आज बुधवार दि: 29 जानेवारी रोजी आगमन झाले. देवस्थान तर्फे अध्यक्ष ॲड पांडुरंग गायकवाड, किसन मुंढे, बन्सी ढोमे, निवृत्ती वाळूंज, भाऊसाहेब पुंडे, विकास घुले, समाधान पुंडे, विक्रम ढोमे यांनी पायी दिंडी सोहळ्याचे उत्साहात स्वागत केले. हलक्या स्वरुपात झालेल्या पावसाने मंदिर परिसर हिरवळीने बहरला आहे. पायी दिंडीत आलेल्या महिला व पुरुष वारकऱ्यांमध्ये पायी दिंडीत चालण्याचा मोठा उत्साह व आनंद भरभरून वाहत होता. दोन वर्षांच्या विलंबानंतर सर्वांना पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लागलेली दिसत होती. 

"अहं वाघा साहं वाघा प्रेमनगरा वारी । सावध होऊनि भजनी लागा देव करा कैवारी ॥ १ ॥ मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी ॥ " 

या अभंगावर वारकरी दंग होऊन नाचत होते. महिला वारकरी मोठ्या संख्येने वारीला चालल्या होत्या. त्यामध्ये वयोवृद्ध वारकर्‍यांचा सहभाग जास्त होता. देवस्थान तर्फे आणि निवृत्ती वाळुंज यांच्या वतीने दोन्ही दिंडीतील शेकडो वारकऱ्यांना अन्नदान महाप्रसाद वाटप करण्यात आला. देवस्थानतर्फे दिंडीप्रमुख व विणेकरी यांचा सन्मान अध्यक्ष ॲड पांडुरंग गायकवाड यांनी केले. त्यानंतर हरिनामाच्या गजरात कुलदैवत खंडोबाचे दर्शन घेऊन दिंड्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या.







टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top