नवचंडी यज्ञामुळे सकारात्मक फलश्रुति प्राप्त होते-आचार्य विवेक पारेकर

0

महाराष्ट्र दर्शन न्युज / निघोज / सागर आतकर

पारनेर तालुक्यातील निघोज येथील कुंड पर्यटन क्षेत्र परिसरातील मळगंगा देवी मंदिर याठिकाणी समस्त ग्रामस्थ निघोज आयोजित नवकुंडात्मक नवचंडी याग (NAVCHANDI YAG MAHAYADNYA) महायज्ञ सोहळ्यास प्रारंभ झाला असून हा कार्यक्रम बुधवार दि.८ जुन ते मंगळवार दि.१४ जुन या कालावधीत संपन्न होणार आहे. हा सोहळा आचार्य विवेक पारेकर ( डोंबिवली ) यांच्या पौराहित्याखाली व ह.भ.प. राजेश दादा सारंग व ह.भ.प.पोपटकाका देशपांडे यांच्या सहकार्‍याने संपन्न होणार आहे. दररोज अभिषेक, वस्त्र, अर्चन, होमहवन, जागर, महाआरती, महाप्रसाद असा कार्यक्रम संपन्न होणार आहे.


आजच्या तिसर्‍या दिवशी सकाळी ९ ते १० यावेळेत मळगंगा देवीचे प्रात: पूजन, अभिषेक, अर्चन, व पाठ करण्यात आले. सकाळी १० ते ११ यावेळेत फळांच्या रसाचा अभिषेक करण्यात आला. सकाळी ११ ते ११:३० वाजता मळगंगा देविला सोनेरी रंगाचे वस्र परिधान केले. तसेच सकाळी ११:३० ते १२ यावेळेत पंचखाद्याचे अर्चन करण्यात आले. व त्यानंतर दुपारी १:३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होमहवन त्यानंतर सायंकाळी ५:३० वाजता महाआरती व महाआरती झाल्यानंतर आलेल्या भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

नवचंडी पुजेमध्ये गणेश पूजन, शिवपूजन, नवगृह पूजन, दुर्गेच्या नऊ रूपांचे पूजनकेले जाते. या पूजेमुळे माणसाच्या जीवनात धनधान्याची वाढ होते नवचंडी यज्ञामुळे सकारात्मक फलश्रुति प्राप्त होते असे तिसर्‍या दिवसाचे विशेष महत्व आचार्य विवेक पारेकर यांनी संगितले.


या कार्यक्रम प्रसंगी निघोज पंचक्रोशीतील तसेच अहमदनगर, पुणे जिल्ह्यातील हजारो भाविक पूजेसाठी उपस्थित होते. उपस्थित हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची सांगता ही कोमलताई पाटोळे (KOMALTAI PATOLE) व आमलेशभाऊ जावळकर (AMLESHBHAU JAWALKAR) यांच्या देवी व खंडोबा देवाच्या गाण्यांनी होणार आहे. तरी मळगंगा देवीच्या भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा तसेच ज्यांना या महायज्ञ सोहळ्यात सहभागी होण्याची इच्छा असेल त्यांनी आपली नावे मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट येथे नोंदवावी असे आवाहन मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे कोषाध्यक्ष ज्ञानदेव नामदेव लंके यांनी केले आहे. 


हे पण वाचा : ज्यांना या महायज्ञ सोहळ्यात सहभागी होण्याची इच्छा असेल त्यांनी आपली नावे मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट तसेच मळगंगा मंदीरात नोंदवावी- ज्ञानदेव नामदेव लंके मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे कोषाध्यक्ष यांचे आवाहन

हे पण वाचा : नवचंडी साधना ही नवदुर्गा पुजा आहे. या उपासनेने शक्ति, समृद्धि आणि यश प्राप्त होते- आचार्य विवेक पारेकर

Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top