महाराष्ट्र दर्शन न्युज / निघोज / सागर आतकर
संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष, ग्रामपंचायत व निघोज आळकुटी जिल्हा परिषद गटाचे सर्वेसर्वा सचिन वराळ पाटील यांचा वाढदिवस सोहळा पार पडला. दिवसभरामध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ तसेच सामाजिक उपक्रम राबवून कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत व निघोज अळकुटी जिल्हा परिषद गटाचे सर्वेसर्वा सचिन वराळ पाटील यांचा वाढदिवस साजरा केला. सचिन वराळ यांच्या वाढदिवसाचे नियोजन हे सायंकाळी निघोज येथील कपिलेश्वर मंगल कार्यालय येथे केले होते. या सोहळ्यास निघोजसह परिसरातील गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद