महाराष्ट्र दर्शन न्युज / पारनेर प्रतिनिधी
दिल्ली या ठिकाणी नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रीय पहिल्या हापकिडो बॉक्सिंग फेडरेशन कप २०२२ या स्पर्धेमध्ये पारनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली आहे. सुवर्णपदके १२, रौप्यपदके ०९ व कांस्यपदके ०६ अशी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. सुवर्णपदक विजेत्या सर्व खेळाडूची आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. हॉरिझॉन स्पोर्टस् ॲण्ड मार्शल आर्टस् च्या संस्थापिका व अहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा आंतरराष्ट्रीय पंच व प्रशिक्षक राजेश्वरीताई कोठावळे यांचे हे सर्व विद्यार्थी खेळाडू आहेत. पारनेर तालुक्यातील खेळाडूंनी उत्तम यश मिळविले. यशस्वी खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे
सुवर्ण पदक विजेते खेळाडू सानिया अल्ताफ शेख, मयुरी लक्ष्मण झरेकर, कनक अमित चौहान, सना समसुल्ला खान, खुशी दिपक करकुट, सृष्टी प्रवीण दिवटे, श्रध्दा संतोष काळे, शेर्या उमेश सातपुते, रेवननाथ नागेश चैधरी, आकाश भगत दौडा, हर्षवर्धन अनंत झरेकर, यश मच्छिंद्र चौधरी या खेळाडूंनी सुवर्णपदक मिळवल्यामुळे या सर्व खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे,
तर रौप्य पदक विजेते मुस्कान अब्दुल सय्यद, प्रांजल गोरक्षनाथ पठारे, पुर्वा अशोक गवळी, आराधना संतोष काळे, पृथ्वीराज संजय करचे, रोहित रामदास दळवी, प्रणव अशोक गवळी, हर्षद दत्तात्रय लिंगे, विराज विशाल उमाप हे खेळाडू आहेत.
तसेच कांस्य पदक विजेते साक्षी संजय गाडीलकर, अनुष्का राजु गुंजाळ, आश्लेषा हर्षल गायकवाड, दक्ष संदीप गुंड, सुरज संतोष शिंदे, सोहम संदिप गुरव या खेळाडूंनी पदके मिळवले आहेत.
सर्व विजयी खेळाडूंचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. पदक विजेते यशस्वी खेळाडू हे पारनेर तालुक्याची संघर्षकन्या आंतरराष्ट्रीय पंच व प्रशिक्षक असलेल्या राजेश्वरी कोठावळे यांच्या स्पोर्ट्स अकॅडमी मधील आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडू हे तयारी करत असतात.


.jpg)
.gif)
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद