महाराष्ट्र दर्शन न्युज / पारनेर प्रतिनिधी- सागर आतकर
राज्य मराठी पत्रकार संघ पारनेरने सामाजिक बांधीलकी जपत हिवरे बाजार , ता.अहमदनगर येथे शनिवार दिनांक १० सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित केलेला " विविध गुणवंतांचा सन्माण सोहळा २०२२" हा कार्यक्रम उत्साहामध्ये संपन्न झाला. सामाजिक बांधिलकी जपत राज्य मराठी पत्रकार संघ पारनेरचे वतीने दरवर्षी विविध उपक्रमांचे आयोजन मोठ्या प्रमाणावर केले जाते. समाजहितासाठी विविध क्षेत्रामधे चांगलं काम करणार्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना दरवर्षी संघटनेच्या वतीने सन्मानित करण्यात येत असते. याही वर्षी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पारनेरचे वतीने " हिवरे बाजार " येथे आयोजित केलेल्या " विविध गुणवंतांचा सन्मान सोहळा २०२२ " हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी आदर्शगाव समीती महराष्ट्र शासनचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांच्या शुभहस्ते हिवरेबाजार येथे सर्व क्षेत्रातील विविध गुणवंतांना सन्मानित करण्यात आले. राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश सचिव विश्वासराव आरोटे यांना अमेरीकन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीची पीएचडी मिळाल्याबद्दल त्यांचा पद्मश्री पोपटराव पवार यांचे शुभहस्ते विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दत्ता पाचपुते हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हासचिव तथा पारनेर तालुका अध्यक्ष दत्ता गाडगेसर हे होते.
उपस्थित मान्यवरांचे शुभहस्ते वृक्षाला जलदान करत कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण " टिंग्या " चित्रपट फेम राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त अभिनेते शरद गोयेकर, गाडी घुंगराची फेम गीतकार संगीतकार शाहीर विलास अटक यांनाही शाल, मानचिन्ह, पुष्पगुच्छ व वृक्षभेट देत सन्मानित करण्यात आले.
यावेळी शाहीर विलास अटक यांच्या सध्या राज्यभर गाजत असलेल्या " गांडी घुंगराची " गाण्याने उपस्थितांंना मंत्रमुग्ध केले.
यावेळी राष्ट्रपती अब्दुल कलाम आझाद व राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे एडीशी असलेले कॅप्टन विठ्ठलराव वराळ, माजी सैनिक दगडू डेरे, दिपक निघुट, सरपंच राहुल गाडगे, दिगंबर शेळके, संजय वाकचौरे, गणपत कुटे, कृष्णाराव वाबळे, संजय शेलार, साहेबराव सोबले,विश्वनाथ लामखडे, स्वाती कावरे यांना तसेच सर्पमित्र गणेश आल्हाट, सर्पमित्र तुषार मोरे यांना पद्मश्री पोपटराव पवार यांचे शुभहस्ते राज्य मराठी पत्रकार संघ पारनेरच्या वतीने शाल, स्मृतीचिन्ह व वृक्षभेट देत सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले, राज्य मराठी पत्रकार संघाने आयोजित केलेला उपक्रम स्तुत्य असुन दरवर्षी समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना ते सन्मानित करत असतात. पुरस्कारामधुन प्रेरणा मिळत असते. आपल्या जिवनात सतत धावपळ असते, मीपण महिन्यात ६ हजार किलोमीटर प्रवास केलाय. पण काही कार्यक्रम असे असतात जेव्हा व्यस्त असतानाही वेळ द्यावाच लागतो. राज्य मराठी पत्रकार संघाने गुणवंतांचा सन्मान सोहळा आमच्या हिवरेबाजारमधे आयोजित केलाय हा आमच्यासाठीसुध्दा आनंददायी असाच आहे. यामुळे पुढच्या कामाला दिशा मिळते. खर तर, आपल्या लोकशाहीची बळकटी म्हणजे पत्रकारीता आहे आणि तो लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. समाजमनाचे प्रतिबिंब म्हणजे पत्रकारीता, समाजामधे जेजे घडते मग ते सकारात्मक, नकारात्मक असो त्याला प्राधान्याने लोकांपर्णंत पत्रकार पोहचवत असतो. पत्रकारीता फार महत्वाची पंचायत समीती लढवली, सरपंच झालो. बाहेरची गर्दी व्हाॅयला लागली. पर्यावरण, पाणी, स्वच्छता, व्यसनमुक्ती यावर आपण काम केले. यामधे सर्वात जास्त समस्या आहेत.आज शेतकरी संघटीत नाही,पंचायत संघटीत नाही. या तीन स्तंभांवर अंकुश ठेवणारा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकारीता आहे. यावेळी त्यांनी हिवरेबाजारच्या विकासाचा धावता आढावा घेतला. आजपर्यंत हिवरेबाजार ग्रामपंचायतने एक जाहीरात कुठल्याही पत्रकाराला दिली नाही. तरी सुध्दा हिवरेबाजार ग्रामपंचायतच्या पाठीशी पत्रकारीता तेवढ्याच ताकतीने उभी होती म्हणुन हिवरेबाजार जगाच्या नकाशावर गेले आहे. यासाठी आम्ही सर्व गांवकर्यांनी केलेले टिमवर्क सुध्दा चांगले होते. माणुस मोठा होण्यापेक्षा काम मोठे झाले पाहीजे. सत्कारातुन आनंद मिळतो. सामाजिक व राष्ट्रीय समस्या नाट्य, तमाशा कलावंतामुळे समजायच्या. चित्रपटांचे माध्यमातुन इतिहास दाखवला जातो. शेतीमधे प्रचंड मोठं संशोधन इस्रोमधे होते. भविष्यात अमेरीकेची आर्मी भारतीय चालवतील एवढी बुध्दीमत्ता भारतीयात आहे. आज स्वावलंबी गाव बनविणे गरजेचे आहे. तरच देश स्वावलंबी होईल.
यावेळी बोलताना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे म्हणाले, आज राज्य मराठी पत्रकार संघाचे माध्यमातुन आयोजित केलेला कार्यक्रम स्तुत्य असा आहे. गोवा, दिल्ली बेळगांव, महाराष्ट्र या चार राज्यात राज्य मराठी पत्रकार संघटना काम करते. पत्रकारांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोण बदलण्यासाठी आम्ही असे स्तुत्य उपक्रम राबवत असतो. संटनेच्या माध्यमातुन कोरोना काळामधे ४ कोटी रुपयांचा किराणा आम्ही लोकांना वाटला. गुणवंत विद्यार्थी सन्मान, वह्यापुस्तकांचे वाटप, चिपळुन, महाड या भागात धान्यवाटप केले. सुरक्षेसाठी आतापर्यंत ७५ हजार हेल्मेटचे संघटनेच्या माध्यमातुन वाटप केले. काम केल्यावर फळ मिळत असते. आज माजी सैनिक, कलावंत, संगीतकार, सर्पममित्र आदि क्षेत्रातील विविध गुणवंतांचा सन्मान केला. पत्रकारांचे वतीने मिळणारा सन्मान अतिशय महत्वाचा असतो. पत्रकारांना ५० लाखांचा विमाकवच देवु अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केली होती. पण प्रत्यक्षात कृती झाली नाही, जिआर काढला नाही याची खंत वाटते. कोरोना काळात राज्यातील २४० पत्रकारांचा मृत्यु झाला. सरकारी अधिकार्यांनाच मदत केली. मग सरकारच्या मदतीची अपेक्षा न करता आम्ही सर्व मृत पत्रकारांच्या कुटुंबियांना त्यांच्या घरी जावुन मदत केली. संघटना हि आपली माता असते. त्यातुन सर्वांना व्यासपीठ मिळाले. समाजाचा पत्रकारांकडे बघण्याचा दृष्टीकोण आपण संघटनेच्या माध्यमातुन बदलला आहे. समाजाचे काम केले तर हाच समाज आपल्याला डोक्यावर घेतो. माझ्या कार्याची दखल घेत अमेरीकन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीने माझ्या कार्याची दखल घेत मला डाॅक्टरेट पदवी दिली. मागील २२ वर्षापासुन आम्ही काम करतो. राज्यामधे आतापर्यंत १९ अधिवेशने घेतली. पत्रकार संरक्षण कायद्यासाठी आझाद मैदानावर आंदोलन केले. ती दखल राज्यपालांनी घेतली. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील पत्रकार जास्त कष्ट घेतो.कोरोना काळात पारनेरचा डंका देशात झाला. तेव्हा शोध घेत आम्ही पारनेरच्या तहसिलदारांना सन्मानित केले. पद्मश्री पोपटराव पवार यांच्यामुळे हिवरेबाजार जगाच्या नकाशावर गेले. मुख्यमंत्री होण्यापेक्षा सरपंच होणे अवघड आहे असे स्वर्गीय विलासराव देशमुख म्हणायचे. पोपटराव यांचे काम फार मोठे आहे. माझे आयुष्यातील काही वर्ष पोपटरावांना मिळो असे आरोटे म्हणाले. पत्रकार संरक्षण कायद्या साठी आपल्याला लढा द्यावा लागेल.
कोणताही आनंद घ्यायचा असेल तर काम करावे लागते असे सांगत त्यांनी संघटनेच्या पारनेर शाखेला धन्यवाद दिले. यावेळी पर्यावरणमित्र पत्रकार लतीफ राजे यांना पद्मश्री पोपटराव पवार यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे जिल्हाध्यक्ष दत्ता पाचपुते म्हणाले, राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या पारनेर शाखेचे काम कौतुकास्पद आहे असे आपणही समाजाचे काही देणे लागतो या उदात्त हेतुने संघटना काम कसत आली आहे.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरुन बोलताना राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हासचिव व पारनेर तालुका अध्यक्ष दत्ता गाडगे यांनी संघटनेचे पुढील राज्यस्तरीय अधिवेशन हिवरेबाजार मधे घ्यावे अशी मागणी केली त्याला पद्मश्री पोपटराव पवारांनी दुजोरा देत योग्य ते सहकार्य करण्याचा शब्द दिला.
याप्रसंगी कॅप्टन विठ्ठल वराळ, मेजर भोसले, चित्रपट अभिनेता शरद गोयेकर (टिंग्या), लोकशाहीर विलास अटक, श्रीमती स्वाती कावरे, सर्पमित्र तुषार मोरे आदींनी आपले विचार व्यक्त केले.
याप्रसंगी राज्य मराठी पत्रकार संघाचे जेष्ठ पत्रकार पीटर रनसिंग, संपत कपाळे, रामदास नरड, बाबाजी वाघमारे, शिरीष शेलार, विनोद गायकवाड, श्रीनिवास शिंदे, आनंदा भूकन, ज्ञानेश्वर लोंढे, गणेश जगदाळे, राम तांबे, लतिफ राजे, संपत वैरागर, संजय मोरे, विशाल फटांगडे सर्व आजी माजी सैनिक, चित्रपट कलावंत, लोकशाहीर, संगीत सर्पमित्र यांचेसह मान्यवर व पत्रकार मोठ्या संखेने हजर होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन पत्रकार लतिफ राजे यांनी केले तर, आभार संघटनेचे तालुका उपाध्यक्ष विनोद गायकवाड यांनी मानले.
राज्य मराठी पत्रकार संघ आयोजित गुणवंतांचा सन्मान सोहळ्यानंतर ग्रामसंसद हिवरेबाजार येथे सत्कारमुर्तींसह पद्मश्री पोपटराव पवार, राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे, जिल्हाध्यक्ष दत्ता पाचपुते, जिल्हासचिव दत्ता गाडगे, कॅप्टन विठ्ठल वराळ व मान्यवर.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद