रामोशी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध - दौलतनाना शितोळे

0

महाराष्ट्र दर्शन न्यूज / पारनेर प्रतिनिधी : 

तालुक्यातील सावरगाव येथे आद्य क्रांतिकारक उमाजीराजे नाईक यांचा जयंती सोहळा साजरा करण्यात आला या कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्रातील रामोशी समाजाचा आवाज जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते दौलत नाना शितोळे हे प्रमुख उपस्थित होते. सावरगाव या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन जय मल्हार क्रांती संघटनेचे बाळासाहेब शिरतार यांनी केले होते. 

यावेळी दौलतनाना शितोळे म्हणाले पारनेर तालुक्यामध्ये रामोशी समाज हा मोठ्या प्रमाणात असून हा समाज गरीब व प्रामाणिक आहे या समाजाचा नेतृत्व येथील बाळासाहेब शिरतार हे करत असून समाजाचे प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी ते नेहमीच कटिबद्ध असतात. तालुक्यातील रामोशी समाजाच्या दृष्टीने बाळासाहेब शिरतार हे पिवळे वादळ असून समाजाला मदत करण्याचे काम करतात.

सरकारने आद्य क्रांतिकार उमाजीराजे नाईक यांची जयंती शासकीय केली व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी त्यादिवशी जयंतीच्या निमित्ताने रामोशी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे समाजातील युवक वर्ग उद्याच्या भविष्यात व्यवसायाकडे वळावे यासाठी या महामंडळाची खऱ्या अर्थाने स्थापना करण्यात येणार आहे. पारनेर तालुक्यातील बाळासाहेब शिरतार सारखे नेतृत्व खऱ्या अर्थाने रामोशी समाजाच्या हिताचे काम करत आहे. अशा नेतृत्वाच्या पाठीमागे या पुढील काळात ताकद उभी करणार आहे. यापुढील काळात रामोशी समाजाचे प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे व समाजाच्या हितासाठी काम करत राहणार आहे.

यावेळी कार्यक्रम प्रसंगी भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे, मा. सभापती गंगाराम बेलकर, शिवाजी बेलकर, हेलिकॉप्टर सरपंच जालिंदर गागरे, मा. सरपंच देवराम मगर, सुभाष गुगळे, मोहन रोकडे, सरपंच वैशाली चिकणे,  उपसरपंच प्रदीप गुगळे, अंबाजी भोसले, चेअरमन साहेबराव चिकणे, प्रकाश चिकणे, सचिन गोडसे, संतोष घनदाट, अण्णा खैरे, रणधीर शिंदे, रामदास साळवे, सुनील माकरे, गणेश शिरतार, भाऊ गाडेकर, अक्षय गाडेकर, मंगेश शिंदे, जगन्नाथ चिकणे, राहुल शिरतार, गंगाराम गुळवे, अलका झरेकर, सुप्रिया रासकर, सारिका लांडगे, शिवाजी जेडगुले, कुलदीप शिरतार, बाळासाहेब गुळवे, संदीप शितोळे, रामदास थोरात, जुबेर शेख आदी मान्यवर व जय मल्हार क्रांती संघटनेचे पदाधिकारी तसेच बाळासाहेब शिरतार यांचा मित्रपरिवार यावेळी मोठ्या संख्येने कार्यक्रमासाठी सावरगाव या ठिकाणी उपस्थित होता.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top