सरकारने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा। जनता दलाची मागणी - नाथाभाऊ शेवाळे

0



शिरूर: राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून खरीप पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. ऑक्टोबर महिना सुरू झाला तरी  पावसाने अजून माघार घेतलेली नाही, त्यामुळे मुसळधार पावसामुळे राज्यातील शेतकरी बांधवांची कांदा, कापूस, सोयाबीन इतर उभी पिकांची नुकसान झाले असून आज शेतकऱ्याचा हातात आलेले पिक नष्ट झाले आहे. याबाबत राज्य सरकारने पाहणी करून त्वरित पंचनामे करावेत. व महाराष्ट्र राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जनता दल (से) महाराष्ट्रच्या वतीने नाथाभाऊ शेवाळे यांनी महाराष्ट्र राज्याचे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांकडे लेखी निवेदन देऊन केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top