कुलस्वामी खंडेरायांचा राज्याभिषेक

0




महाराष्ट्र दर्शन न्युज / श्री क्षेत्र कोरठण :

महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे कुलदैवत व श्रद्धास्थान असलेलं श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान पिंपळगाव रोठा, ता पारनेर,जि. अहमदनगर या 'ब' वर्ग तीर्थक्षेत्रावर चंपाषष्ठी रौप्य महोत्सवी उत्सवानिमित्त कुलस्वामी खंडेराय चरित्र कथेचे आयोजन करण्यात आले आहे. कथाकार ह.भ .प डॉ. गजानन महाराज काळे यांच्या रसाळ अमृतवाणीतून भाविक भक्त कथा श्रवण करीत आहेत. महाराजांनी यावेळी बानाई कोण आहे? खरोखर ती धनगराची आहे का? हिंदोळा वृत्त म्हणजे काय? दवणा कोण? दद्योधन पूजा कशी करावी? खेटी का घालावी ?चंपाषष्ठीवृत्त कसे येळकोट येळकोट जय मल्हार का म्हणावे ?याबाबतीत उपस्थित भाविक भक्तांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर खंडेराय राज्याभिषेक प्रसंग हुबेहूब साकार करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. जय मल्हार विद्यालयातील विद्यार्थी करण भांबरे, प्रमोद सुंबरे, सुरज मुळे,प्रणव बोरुडे, वृषाली राजदेव, शेख अलिशा साईराज तिकोने, तसेच विद्यालयाचे माजी विद्यार्थी सुरज भांबरे व आरती भांबरे या जोडप्याने खंडेराया बाणाईदेवी प्रसंगांमध्ये सचित्र सहभाग नोंदवला. 

      याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष सौ शालिनी घुले, उपाध्यक्ष महेश शिरोळे, खजिनदार तुकाराम जगताप, मा.अध्यक्ष ॲड पांडुरंग गायकवाड, मा. सरपंच अशोक घुले,विश्वस्त रामदास मुळे, धोंडीभाऊ  जगताप, चंद्रभान ठुबे, दिलीप घुले,अर्जुन लाड पाटील, दत्तात्रय खोसे. ह.भ.प जनार्दन महाराज मुंडे, मार्तंड जगताप, किसन मुंडे, दत्तात्रय शेठ विष्णू भोर येडगाव, शिवाजी गणपत दमक येडगाव, बबन बांगर, सुरेश शेठ गुंजाळ, कैलास गुंजाळ, गीताराम गुंजाळ, लक्ष्मण नागुडे, सदानंद भुजबळ राहणार सर्व कांदळी जुन्नर तसेच परिसरातील महिला भाविक भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. 

   यावेळी आमदार निलेश लंके यांचे मोठे बंधू दिपक अण्णा लंके उपस्थित होते. त्यांनी भाविक भक्तांना देवस्थानच्या विकास कार्यात यापुढे कुठल्याही प्रकारची कमतरता पडू देणार नाही असे आश्वासन दिले.

      देवस्थान तर्फे पिण्याचे पाणी. दर्शन व्यवस्था व पार्किंग यांचे नियोजन आहे. तसेच मंदिरावरील आकर्षक विद्युत रोषणाई ही भावी भक्तांचे मन आकर्षित करून घेत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top