अल्पसंख्यांक समाजाला पुढे घेऊन जाण्याचे काम आमदार साहेब नक्की करतील - सौ.राणीताई लंके ( जिल्हा परिषद सदस्या)

0



महाराष्ट्र दर्शन न्यूज / पारनेर / प्रतिनिधी-सागर आतकर

संत निळोबारायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पिंपळनेर येथे संतश्रेष्ठ सेना महाराज मंदिर सभामंडपासाठी आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून दहा लाख रुपयाचा निधीचा मंजूर करण्यात आला असून या सभामंडपाचा  भूमिपूजन सोहळा जिल्हा परिषद सदस्या सौ.राणीताई लंके यांच्या शुभहस्ते पार पडला. 

यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, जिल्हा उपाध्यक्ष शामराव जाधव, सभापती सुदाम पवार, सरपंच देवेंद्र लटाबळे, उपसरपंच साधना हजारें, माजी सरपंच सुभाष गाजरे, माजी उपसपंच राजुशेठ रासकर, बापूसाहेब औटी, रमेश बिडवे या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

तुमचा समाज अल्पसंख्याक समाज आहे. त्यामुळे समाजाला पुढे घेऊन जाण्याचे काम आमदार साहेब नक्की करतील अशी मी ग्वाही देते- सौ.राणीताई लंके ( जिल्हा परिषद सदस्या)

सरपंच श्री देवेंद्र लटाबळे यांनी समाजाला सर्वोतपरी मदत ग्रामपंचायत कडून केले जाईल अस मत व्यक्त केले.



यावेळी ओबीसी सेलचे मनोहर राऊत, कार्याध्यक्ष नवनाथ राऊत, सचिव विनायक कुटे, सह सचिव सुनील आतकर, माजी अध्यक्ष बबनराव आतकर, जनसेवा पक्षाचे तालुका अध्यक्ष मुरली आतकर, संतसेवक भाऊसाहेब सोनवणे, सोन्याबापू जाधव, सुखदेव राऊत, माऊली कोरडे, सुरेश वाघमारे, दिपक वाघमारे, सागर आतकर, गोरख राऊत, संजय वाघचौरे (मेजर ), संदीप वाघमारे, राम साळुंके, गणेश जाधव, सुभाष आतकर, अमोल साळुंके, संदीप भोसले, राम शिंदे, नवनाथ जाधव, संजय महाराज कार्ले, कैलास कार्ले, विजुभाऊ कार्ले, अक्षय काळे, सुरेश राऊत, रभाजी पावडे, किसन शिंदे, धनंजय सोनवणे, दत्ता सोनवणे, साहेबराव वाघमारे, विशाल राऊत, संदीप राऊत, पांडुरंग राऊत (मेजर ), राजेंद्र क्षीरसागर, शिंदे पोपटराव, संदीप क्षीरसागर, कल्याण वाघमारे, मच्छिन्द्र वाघमारे, सौ पूजाताई सोनवणे, सौ.जयश्रीताई बिडे आदी समाज बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ हे होते. तालुका उपाध्यक्ष शाम साळुंके यांनी अध्यक्ष स्थानाची सूचना मांडली यास नाभिक युवक संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रसादभाऊ भोसले यांनी अनुमोदन दिले. तर पारनेर तालुका नाभिक संघटनेचे अध्यक्ष भाऊ बिडे यांनी आभार मानले व या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुळशीराम कुसळकर (सर )यांनी  केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top